मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-77-माझा आवडता ऋतू उन्हाळा

Started by Atul Kaviraje, December 29, 2022, 09:19:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-77
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता ऋतू उन्हाळा"

     भारतात मुख्य ऋतु तीन आहेत. उन्हाळा हा त्यातीलच एक ऋतु आहे. उन्हाळा हा अतिशय गरम ऋतु असतो. पण तरीही काही लोकांना हा ऋतु खूप आवडतो. उन्हाळा 4 महिन्यासाठी असतो (मार्च, एप्रिल, मे आणि जून) पण या महिन्यापैकी मे आणि जून हे सर्वात जास्त गरम महिने असतात. उन्हाळ्यात सुर्य पृथ्वीच्या जास्त जवळ आलेला असतो. या महिन्या मध्ये दिवस मोठे व रात्र लहान असतात.

     उन्हाळ्याची सुरवात होळी च्या उत्सवानंतर व्हायला लागते. या ऋतूत उन्हामुळे जमिनीवरील पाण्याचे बाषपीभवन होऊन त्याचे आकाशात ढग बनायला लागतात व पावसाळ्यात याच ढगांमुळे पाऊस येतो. या ऋतूत शाळा कॉलजाना सुट्ट्या असतात. त्या मुळेच मुलांना मनोरंजन व आराम मिळतो.

     पण एकीकडे हा ऋतु लहान मुलांना आनंद देतो तर दुसरी कडे याचे नुकसान पण सहन करावे लागतात. उन्हाळा लोकांना खूप साऱ्या संकटात देखील टाकतो. अतिउच्च उष्णते मुळे उन्हाळ्याच्या दुपारी शरीरात पाण्याच्या कमतरतेने लोकांना लू लागल्याने आजार वाढतात. यामुळे बरेच लोक मृत्युमुखी सुद्धा पडतात.

     उन्हाळ्यात भारतातील बऱ्याच ठिकाणी लोक पाण्याच्या कमतरते मुळे दुष्काळाला सामोरे जातात. कारण या दरम्यान सर्व नद्या, नाले, तलाव व विहिरी कोरड्या पडतात. या सोबतच झाडांचे पाने सुद्धा पाण्याचे कमतरतेने गळून पडतात. चारही बाजूंना धूळ युक्त गरम हवा वाहत असते, हि हवा लोकांच्या आरोग्याला हानिकारक असते. म्हणून अश्या काळात अधिकाधिक फळ खायला हवीत. थंड पेय प्यायला हवीत व उन्हापासून स्वतःचा बचाव करायला हवा.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.12.2022-गुरुवार.