वर्ष सरत चाललं

Started by शिवाजी सांगळे, December 30, 2022, 04:33:12 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वर्ष सरत चाललं

वर्ष सरत चाललं मन का झुरत राहीलं
प्रश्न करीत स्वतःस, मागे काय रे उरलं

सोड म्हणता सुटेना मोह करतोच प्रश्न
निसटत्या क्षणांनी मना पुन्हा विचारलं

सापडेना उत्तर फिरूनी प्रश्नाचें अस्तर
कळेना उगा मन मागे मागे का धावलं

न बोलता सोसलं सारं पुढ्यात आलेलं
गवसेल का हाताला कधी भलं झालेलं

हिशोब झाला गेला आता हातात उरला
सापडता जरी काही फायदा का होईल?

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९