०१-जानेवारी-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, January 01, 2023, 09:38:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०१.०१.२०२३-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                    "०१-जानेवारी-दिनविशेष"
                                   -----------------------

-: दिनविशेष :-
१ जानेवारी
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२०००
ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.
१९३२
सकाळ
सकाळ वृत्तपत्राचा पहिला अंक
डॉ. ना. भि. परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.
१९१९
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
१९०८
'संगीतसूर्य' केशवराव भोसले यांनी हुबळी येथे 'ललित कलादर्श' ही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली.
१९००
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
१८९९
क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.
१८८३
पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना
१८८०
विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे 'न्यू इंग्लिश स्कूल'ची स्थापना केली.
१८६२
इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
१८४८
महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.
१८४२
बाबा पद्मनजी यांचे 'ज्ञानोदय' वृत्तपत्र सुरू झाले. नव्वद वर्षांनंतर याच दिवशी डॉ. ना. भि. परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.
१८०८
यू. एस. ए. मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.
१७५६
निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना 'न्यू डेन्मार्क' असे नाव देण्यात आले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९५१
नाना पाटेकर – अभिनेता
१९५०
दीपा मेहता – भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका
१९४३
रघुनाथ माशेलकर – शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण
१९४१
गोवर्धन असरानी ऊर्फ 'असरानी' – चित्रपट कलाकार
१९३६
राजा राजवाडे – साहित्यिक
(मृत्यू: २१ जुलै १९९७)
१९२८
डॉ. मधुकर आष्टीकर – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष
(मृत्यू: २२ मे १९९८)
१९२३
उमा देवी खत्री उर्फ 'टुन टुन' – अभिनेत्री व गायिका
(मृत्यू: २४ नोव्हेंबर २००३)
१९२०
भरा
श्रीधर पार्सेकर – व्हायोलिन या वाद्यावर विलक्षण हुकूमत असणारा हनहुन्नरी कलाकार, एकल प्रस्तुती व साथसंगत या दोन्हींत त्यांचे सारखेच प्राविण्य होते. व्हायोलिनबरोबरच ते तबला, हार्मोनिअम, जलतरंग आणि क्लॅरिनेटही वाजवत असत. वाकडं पाऊल (१९५६), मर्द मराठा (१९५१), सोन्याची लंका (१९५०), भाग्यरेखा (१९४८), कुबेर (१९४७), भक्त दामाजी (१९४२) इत्यादी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन तर गोकुळ का राजा (९१५४), अंधोंका सहारा (१९४८), मेरी अमानत (१९४७), नगद नारायण (१९४३) इत्यादी चित्रपटांचे संगीत संयोजन त्यांनी केले.
(मृत्यू: १० सप्टेंबर १९६४)
१९१८
शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी
(मृत्यू: ९ ऑगस्ट २००२)
१९१०
जानकीदास मेहरा ऊर्फ जानकीदास – हिन्दी चित्रपटातील चरित्र अभिनेते, निर्माते आणि पटकथालेखक, १९३६ मध्ये बर्लिन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य, ८ विश्वविक्रम मोडणारे निष्णात सायकलपटू
(मृत्यू: १८ जून २००३)
१९०२
कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक
(मृत्यू: ६ डिसेंबर १९७१)
१९००
श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू
(मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७४)
१८९४
सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४)
१८९२
महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक
(मृत्यू: १५ ऑगस्ट १९४२)
१८७९
इ. एम. फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक
(मृत्यू: ७ जून १९७०)
१६६२
बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा
(मृत्यू: १२ एप्रिल १७२०)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००९
रामाश्रेय झा – संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान
(जन्म: ११ ऑगस्ट १९२८)
१९८९
दिनकर साक्रीकर – समाजवादी विचारवंत व पत्रकार
१९७५
शंकर वासुदेव किर्लोस्कर
शंकर वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार. १९२० मधे त्यांनी किर्लोस्कर छापखान्याची (Kirloskar Press) स्थापना केली. त्यातुनच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचे संपादन सुरू केले. 'शंवाकिय' हे त्यांचे आत्मकथन हा उत्कृष्ट आत्मचरित्राचा नमुना आहे.
(जन्म: ८ आक्टोबर १८९१)
१९५५
डॉ. शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक
(जन्म: २१ फेब्रुवारी १८९४)
१९४४
सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार
(जन्म: २९ मार्च १८६९)
१८९४
हेन्‍रिच हर्ट्‌झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)
१७४८
योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ
(जन्म: २७ जुलै १६६७)
१५१५
लुई (बारावा) – फ्रान्सचा राजा
(जन्म: २७ जून १४६२)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2023-रविवार.