मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-80-माझा आवडता ऋतू हिवाळा

Started by Atul Kaviraje, January 01, 2023, 09:58:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                   निबंध क्रमांक-80
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता ऋतू हिवाळा"

     हिवाळ्याची सुरुवात भारतात दसरा नंतर व्हायला लागते. पावसाळा समाप्तीच्या 2 महिन्यांनंतर हिवाळा सुरू होतो. या ऋतूत थंडी पासून रक्षणासाठी लोक जाड लोकरी चे स्वेटर वापरतात. उन्हाळ्यात पडणाऱ्या कडक उन्हापेक्षा हिवाळ्यातील थंडी मला जास्त आवडते. या ऋतूत दिवस लहान असतात 5 वाजेच्या सुमारास लवकर अंधार पडते.

     हिवाळ्यात खूप सारे पीक लावले जातात. हिवाळ्याला शरद ऋतू देखील म्हटले जाते. हा ऋतु शेतकऱ्यांसाठी पेरणीचा ऋतु असतो. भारतात लोक या ऋतुचा खूप आनंद मनवतात. मला हिवाळ्यात उष्ण मसालेदार चहा आणि पाकोडे खयायला आवडते.

     हिवाळ्यात शाळांना हिवाळी सुट्ट्या मिळतात. मुले खूप सारे खेळ जसे क्रिकेट, हॉकी, व्हॉलीबॉल ई. खेळतात. या ऋतूत सकाळी सकाळी धुक्या मुळे रस्ते झाकले जातात, बऱ्याचदा समोरून येणारी वाहने सुद्धा दिसत नाहीत. धूक्या मुळे बरेच दिवस लोकांना सूर्याचे दर्शन पण होत नाही.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2023-रविवार.