मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-55

Started by Atul Kaviraje, January 01, 2023, 10:02:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                  "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-55
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "सुरकोटला अश्व-भाग 3"

                               सुरकोटला अश्व-भाग 3--
                              ---------------------

     सध्याच्या उत्तर राजस्थान मध्ये शेतांची नांगरणी करताना उभ्या आडव्या रेषांमधील घळी जशा शेतकरी तयार करतात बरोबर तशाच घळी असलेले इ.स.पूर्व 2800 मधील एक शेत कालीबंगा येथील उत्खननात सापडले आहे.

     हरयाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश यात मोहरीचे पीक घेताना या नांगरलेल्या घळी दूर अंतरावर पाडण्यात येतात तर हरबर्‍याचे (छोले) पीक घेताना या घळी जवळ जवळ पाडल्या जातात. हडप्पा कालात हीच पद्धत अवलंबली जात होती याचा स्पष्ट पुरावा आम्हाला मिळाला आहे.

     सध्या पूजले जाणारे शिवलिंग व त्याच्या खाली असलेला योनीचा भाग यांसारखेच बरोबर दिसणारे लिंग कालीबंगा येथे मिलाले आहे.

     बाणावली, राखीगंगा व लोथल येथे अग्निकुंडा सारखी दिसणारी बांधकामे सापडली आहेत.

     भाजलेल्या मातीतून बनवलेल्या प्रतिकृतींमध्ये, योगासने करणार्‍या व्यक्ती, कपाळावर लाल टिळा, काळ्या रंगाच्या केसात पाडलेल्या भांगात लाल शेंदूर व अंगावर पिवळ्या रंगात सोन्याचे दागिने रंगवलेल्या स्त्रिया आणि हात जोडून नमस्ते पद्धतीचे अभिवादन करणार्‍या प्रतिकृती आश्चर्यजनक आहेत. "

     श्री लाल यांच्या भाषणातील इतर भाग आतापर्यंतच्या आपल्या सर्वसाधारण समजुतींना मोठ्या प्रमाणात धक्का देणारा असल्याने त्याचा विचार तज्ञांनीच करणे जास्त योग्य ठरेल. मात्र आपण यातून एवढेच तात्पर्य उचलायचे की हडप्पा संस्कृती ही नष्ट झाली किंवा विलयास गेली हा तर्क योग्य नसून कदाचित या संस्कृतीतूनच नवी वैदिक संस्कृती उदयास आली असे म्हणणे जास्त योग्य ठरावे.

--क्रमशः--

--चंद्रशेखर
----------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2023-रविवार.