एकटा

Started by futsal25, August 30, 2010, 12:42:44 PM

Previous topic - Next topic

futsal25

मी जेव्हा एकटा असतो
तेव्हा खरच चांगला असतो
तस म्हणायला 'एकटा असतो'
पण तसा एकटेपणा सोबत असतो

तो माझी पाठच सोडत नाही
सुखात, जास्त करुन दु:खात
माझ्या सोबतीला असतो
त्याचा मला, मला त्याचा
कंटाळा कसा येतच नाही

तसा मी 'बडबडय़ा' आहे
पण एकटेपणा 'अबोल' आहे
'मी' तासनतास त्याच्याशी बोलतो
'तो' मात्र वेडा, माझ्याशी बोलतच नाही

माझ्याच शब्दांचे ध्वनी, जेव्हा
लांब कुठेतरी आपटुन, प्रतिध्वनी
बनुन, एकटेपणा चिरत येतात
तेव्हा मीच ते एकांतात ऎकतो

माझी बडबड मात्र 'तो' एकटक ऎकतो
त्याला कंटाळा कसा माहितच नाही
मग मीच कधी त्याच्यावर रुसतो
मित्रांच्या मैफलीत जाऊन बसतो

तिथ थोडावेळ गर्दित रमतो
पण तरी एकटाच असतो
सोबतीला परत एकटेपणा असतो



     -सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)  :)


santoshi.world

chhan ahe  ......... mala hi maza एकटेपणा avadato ......  to hi kahisa asach ahe :)

PRASAD NADKARNI

mai aur meri tanahai
chan aahe

aspradhan

तिथ थोडावेळ गर्दित रमतो
पण तरी एकटाच असतो
सोबतीला परत एकटेपणा असतो
Ekatepanachi saath nehmi asate!!!!

justsahil

एकटेपणालासुद्धा  कंटाळून पुन्हा
झालो होतो मी एकटा...........
मिश्कीलपने हसत त्याने विचारले...
काय मिळविलेस एकटे राहून?
सावली सुद्धा तुझी नसेल विचार तुझ्या मनाला जाऊन.

विचार त्याचे पटताच, पुन्हा वळालो एकटेपणाकडे,
एकटेपणाशी बोलता बोलता
बहरले नवीन कवितांचे सडे..........