घाव

Started by futsal25, August 30, 2010, 01:03:51 PM

Previous topic - Next topic

futsal25

सारेच साव येथे
बाके बनाव येथे

पाहून चेहरे हे
देतात भाव येथे                                 

पुसतात लोक सारे
माझेच नाव येथे

मरतात रंक तेथे                 
उरतात राव येथे

माझ्या पराभवाचे
शिजतात डाव येथे

नेते रसातळाला
माझीच हाव येथे

माझ्याच शेवटाला
जमले न गाव येथे

मी लावतॊ उद्यावर
उलटेच दाव येथे

रेखीव श्र्वापदांना   
भलताच वाव येथे

जमतात नाडण्यासी
भॊंदू जमाव येथे

करतात प्रेम जेव्हा
मिळतात घाव येथे

- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)  :(  ;)  :)


amoul

khup khup khup chhan aahe kavita!!! aani kay sher aahet mastach

ghodekarbharati

khupach chan. Agadi chan.

pawar


santoshi.world

करतात प्रेम जेव्हा
मिळतात घाव येथे

chhan aahe kavita avadali ......... :)

justsahil

खरच.....असच  होतं. छान कविता आहे

Vkulkarni

सुरेख..., तुम्ही मायबोलीवर पण आहात काय?