मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-85-माझा आवडता सण - मकर संक्रांत

Started by Atul Kaviraje, January 06, 2023, 09:39:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-85
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता सण - मकर संक्रांत"

     मकरसंक्रांत हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे, या दिवशी सूर्य हा उत्तर राशीत प्रवेश करतो. या सणाची विशेषता ही आहे की दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीलाच हा सण साजरा होतो. मकरसंक्रांतीचा संबंध पृथ्वीच्या भूगोल आणि सूर्याच्या स्थितीशी आहे. दरवर्षी सूर्य 14 जानेवारीलाच मकर रेखे वर येतो. यामुळे मकर संक्रांत देखील 14 जानेवारीला साजरी केली जाते.

     भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रात मकर संक्रांतीला वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जाते. महाराष्ट्रात संक्रांतीला मकर संक्रांत म्हटले जाते. आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटक मध्ये याला संक्रांति असे म्हटले जाते. तमिळनाडूमध्ये याला 'पोंगल' पर्व म्हटले जाते. पंजाब आणि हरियाणा मध्ये नवीन पिकाचे स्वागत करत लोहडी सण साजरा केला जातो. आसाम राज्यात बिहू नावाने मकर संक्रांतीच्या या सणाला साजरे केले जाते. भारतातील प्रत्येक राज्यात मकरसंक्रांतीचे नाव व साजरे करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत.

     वेगवेगळ्या प्रदेशानुसार मकर संक्रांतीत बनवले जाणारे व्यंजन वेगवेगळे असतात, परंतु तीळ आणि गुळाचे या दिवशी विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुगंधित उटने लाऊन आंघोळ केली जाते. यानंतर तिळगुळाचे लाडू बनवले जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याच्या रीवाज देखील आहे.  विशेष करून गुजरात व राजस्थान या राज्यांमध्ये पतंग उडवली जाते.

     मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ खाण्याचे महत्त्व देखील आहे. मकर संक्रांत थंडीच्या दिवसात येते या काळात तीळ गूळ खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते. म्हणून या दिवशी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण तिळगुळ वाटतात. इत्यादी अनेक कारणांमुळे माझा आवडता सण मकर संक्रांत आहे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.01.2023-शुक्रवार.