प्रेमासाठी वाहिल्या किती मी शपथा, हे तुला नाही कळले ग !

Started by Atul Kaviraje, January 08, 2023, 10:49:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक विरह-गीत ऐकवितो. "मुझे तुमसे प्यार कितना, ये तुम नही जानते, मगर जी नही सकते तुम्हारे बिना"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही निशा - रविवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (मुझे तुमसे प्यार कितना, ये तुम नही जानते, मगर जी नही सकते तुम्हारे बिना)
-------------------------------------------------------------------------

                प्रेमासाठी वाहिल्या किती मी शपथा, हे तुला नाही कळले ग !
               ----------------------------------------------------
                   
प्रेमासाठी वाहिल्या किती मी शपथा, हे तुला नाही कळले ग !
झिडकारून गेलीस माझे प्रेम, मन नाही हळहळले ग !

प्रेमासाठी मी ग तुझ्या, काय नाही केले ?
प्रेमासाठी मी ग तुला, सर्वस्व वाहिले
     पारख नाही खऱ्या प्रेमाची
     लाथाडून गेलीस ग !

प्रेमासाठी वाहिल्या किती मी शपथा, हे तुला नाही कळले ग !
झिडकारून गेलीस माझे प्रेम, मन नाही हळहळले ग !

सच्चे प्रेम केले तुजवरी, का ग तू नाकारिले ?
अशी का तू वागलीस, वैर माझ्याशी धरिले
     मन माझे ढाळतय अश्रू
     उपेक्षाच केलीस ग !

प्रेमासाठी वाहिल्या किती मी शपथा, हे तुला नाही कळले ग !
झिडकारून गेलीस माझे प्रेम, मन नाही हळहळले ग !

विश्वास होता माझा तुजवरी, फळ मला असे दिले
विश्वासाचा घात करुनि, जहर तू का पेरले ?
     अपेक्षेने कुणा पाहू मी
     भंग करुनी गेलीस ग !

प्रेमासाठी वाहिल्या किती मी शपथा, हे तुला नाही कळले ग !
झिडकारून गेलीस माझे प्रेम, मन नाही हळहळले ग !

प्रेम माझ्या नशिबी नाही, मी तेव्हा केलेले
प्रेम माझे जपले नाहीस, मी तुजला दिलेले
     अर्थच नाही कळला प्रेमाचा
     खेळच त्याला समजलीस ग !

प्रेमासाठी वाहिल्या किती मी शपथा, हे तुला नाही कळले ग !
झिडकारून गेलीस माझे प्रेम, मन नाही हळहळले ग !

प्रेमावर नाही विश्वास आता, स्वप्न माझे भंगलेले
विरहाचे नशिबी आता, दुःस्वप्न माझ्या आलेले
     मन माझे मोडून तू
     अशी कशी गेलीस ग !

प्रेमासाठी वाहिल्या किती मी शपथा, हे तुला नाही कळले ग !
झिडकारून गेलीस माझे प्रेम, मन नाही हळहळले ग !
==============================

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.01.2023-रविवार.

(विशेष सूचना- कुणालाही या गाण्याचा योग्य तो वापर करायचा असेल, किंवा गायचे असेल, तर माझी काही हरकत नाही. तुम्ही हे गाणे गाऊ शकता, मला याचे काहीही अधिकार नकोत.)
=========================================