नको पर्यटन धार्मिक क्षेत्रांचे

Started by Atul Kaviraje, January 09, 2023, 12:38:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     जानेवारी-२०२३, नवं-वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात यु-ट्यूब ला बातमी ऐकली, की झारखंड येथील गिरिडीह स्थानी, पारसनाथ पर्वतावरील श्री सम्मेद शिखर या पावन-पवित्र, जैन-मंदिर क्षेत्राचे, झारखंड सरकार पर्यटन क्षेत्रात रूपांतर किंवा परिवर्तन करणार आहे. अश्या या अति पुरातन पवित्र मंदिराचे पर्यटन स्थळात रूपांतर होणे हे जैन धर्मियांच्या भावना दुखावण्यासारखे आहे. त्यासाठी जैन जनांनी पूर्ण भारतभर आंदोलन पुकारले आहे. त्यांना माझाही पूर्ण पाठिंबा आहे. या धर्तीवर ऐकुया एक वास्तव-वादी कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "नको पर्यटन धार्मिक क्षेत्रांचे"

                                "नको पर्यटन धार्मिक क्षेत्रांचे"
                               --------------------------

धर्म जगन्मान्य अखिल धर्मात
पावित्र्य भरलंय जैन धर्मात
महावीर आहे देवाचा प्रेषित,
जैन धर्मियांचा एक देवदूत

     दिगंबर आणि श्वेतांबर पंथ
     अति धार्मिक जैन जनांस
     आजही सर्वमान्य या पंथाचा,
     स्वीकार होतोय जैन धर्मात

झारखंड नगरी, गिरिडीह स्थानी
पारसनाथ डोंगरी पवित्र मंदिर
२० तीर्थंकरांचे निर्वाण स्थान हे,
नाम त्याचे श्री सम्मेद शिखर

     भाविक जैन स्थळास भेटती
     महावीर पुण्य चरणी लागती
     मनःशांतीचे हे उत्तम स्थळ,
     येथील सदा-सर्वदा प्रसन्न काळ

झारखंड सरकारची नजर वळलीय
मनोहर, नयन-रम्य दृश्ये भावलीय
हवेशीर, शुद्ध प्राणवायूचा पर्वत,
तब्येतीची नीट पारख झालीय

पर्यटनाचे प्रयत्न सुरु झालेत
स्थळ बनविण्या प्रवृत्त झालेय
सरकारने फक्त पैसे पाहिलेत,
पर्यटन क्षेत्र खुले झालेय

     मान्य नाहीय जैन जनांस
     पवित्र स्थळ मानत आलेत
     पावित्र्य जपलंय या मंदिराचे,
     पाइकच आहेत ते शांततेचे

आंदोलन सुरु केलंय त्यांनी
पर्यटन क्षेत्रास नाहीय मंजुरी
अमंगळाचा येथे स्पर्शही नको,
अस्वच्छतेचे येथे नावही नको

     पर्यटक येणार, स्वच्छता डगमगणार
     मांगल्य जाणार, पावित्र्य ढळणार
     निदर्शनास त्यांच्या जोर आलाय,
     सम्मेद शिखर पाहून भारावलाय

सर्व-धर्मियांनी आपला धर्म जपावा
धर्म-स्थळांचा नाव-लौकिक राखावा
अति-क्रमणा विरुद्ध बंड पुकारावा,
देवळातला देव मनोभावे पूजावा

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.01.2023-सोमवार.
=========================================