कोविडचे थैमान झालंय सुरु

Started by Atul Kaviraje, January 09, 2023, 03:50:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     कोविड-कोरोना, हा पँडेमिक कडून एंडेमिककडे कधी झुकेल, याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. गेल्या तीन वर्षांपासून मनुष्य या व्हायरस-विषाणूचा बळी पडत आहे. नवं-नवीन प्रकार, व्हेरिएंट हा कोरोना जन्मास घालत असल्यामुळे, तो जणू नाशवंतच ठरला आहे. असो, मानव अजूनही कोरोना बरोबर युद्ध खेळत आहे. केव्हा न केव्हातरी मनुष्य जिंकेल याच आशेवर आपण जिवंत आहोत. सध्या म्हणजे डिसेंबर-२०२२, पासून एक नवीन व्हेरिएंट चीन मध्ये हाहा:कार माजवीत आहे. ऐकुया तर या वास्तव-वादी विषयावर एक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "कोविडचे थैमान झालंय सुरु"

                             "कोविडचे थैमान झालंय सुरु"
                            --------------------------

कोविडचे थैमान झालंय सुरु
कोरोना आहे साऱ्या व्हायरसांचा गुरु

२०१९-ला चीनमध्ये प्रयोगशाळेत जन्मला
पाहता-पाहता जगभर पसरला
प्रत्येकाच्या घरी नकळत शिरला
माणूस आजारपणाने हैराण झाला,
     विषारी कोरोना लागलाय पुन्हा फुत्कारु
     कोरोना आहे साऱ्या व्हायरसांचा गुरु

२०२०-गेले, २०२१-ही आजारपणात गेले
डिसेंबर-२२ ला पुन्हा गरळ ओकू लागले
अति-सूक्ष्म विषाणू याचा, दिसत नाही डोळ्यांना
घातक आहे फक्त तो मनुष्य प्राण्यांना,
     कोरोनाचा पुन्हा जोर लागलाय धरू,
     कोरोना आहे साऱ्या व्हायरसांचा गुरु

कित्येक दगावले, कित्येक अंथरुणास खिळले
घरच्या-घरी साऱ्यांनी स्वतःस कोंडून घेतले
संपूर्ण देशाला मोठे टाळे लागले
व्यवहार सारे अवचित ठप्प झाले,
     मानवाच्या जीवनाची बरबादी झाली सुरु,
     कोरोना आहे साऱ्या व्हायरसांचा गुरु

लशी निघाल्या, डोसही निघाले
प्रत्येकाने आवश्यक ते टोचून घेतले
इम्युनिटी वाढवायचे प्रकारही वाढले
थोडा काळ कोरोनाचे निराकरणही झाले,
     कोरोनाची वाकडी नजर पुन्हा लागलीय फिरू,
     कोरोना आहे साऱ्या व्हायरसांचा गुरु

मनुष्यच घेतोय स्वतः ओढवून मरण
क्षुद्र आहे इतके, त्याचे हे जीवन ?
कितीही गेले शास्त्र पुढती
नवीन रोग हळूच येतोय मागुती,
     कोविडच्या निर्दालना उपाय-योजना करू,
     कोरोना आहे साऱ्या व्हायरसांचा गुरु

सरकारचे त्रिसूत्री नियम पाळूया
मास्क, हॅन्ड-वॉशिंग अन डिस्टन्स ठेवूया
लशी टोचूया, इम्युनिटी वाढवूया
सर्वार्थाने तब्येतीची काळजी वाहूया,
     प्रण करूया, कोरोनास मारू किंवा मरू,
     कोरोनाचे कायमचेच निर्दालन करू.
     
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.01.2023-सोमवार.
=========================================