मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-88-रक्षाबंधन

Started by Atul Kaviraje, January 09, 2023, 09:50:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-88
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "रक्षाबंधन"

     मित्रांनो आपल्या देशात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. हे सण आपल्यात कौटुंबिक आणि सामाजिक एकता वाढवतात. अश्याच सणांपैकी एक आहे रक्षाबंधनाचा सण. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सण असतो या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. आजच्या या लेखात आपण रक्षाबंधन या सणाचा मराठी निबंध पाहणार आहोत. या निबंधला तुम्ही Maza avadta san rakshabandhan म्हणूनही वापरू शकतात. तर चला सुरू करूया.. 

     रक्षाबंधन हा हिंदू धर्माच्या एक प्रमुख सण आहे. हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासुत्र, म्हणजेच राखी बांधते आणि भावाची प्रगती व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते. भावाकडून पण बहिणीला संरक्षणाचे वचन दिले जाते. राखीच्या या सणाला संपूर्ण भारतात साजरा करतात. भारतासह नेपाळ व अन्य ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्माला मानणारे लोक राहतात तेथे साजरे केले जाते. 

     रक्षाबंधन या सणाला प्राचीन काळापासून साजरे केले जात आहे. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये रक्षाबंधनच्या उल्लेख केला आहे. आजकाल रक्षाबंधनच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या घरी राखी व मिठाई घेऊन जातात. राखी बांधल्या नंतर भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून काही पैसे किंवा उपहार भेट देतो. अश्या पद्धतीने एक दुसऱ्याला वस्तू दिल्याने भाऊ बहिणी मध्ये प्रेम वाढते.

     रक्षाबंधनच्या दिवशी सर्वजण नवे कपडे परिधान करतात. सर्वांचे मन आनंदाने भरून जाते. रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी बहिणी बाजारात जाऊन चांगल्या प्रकारच्या राख्या भावांसाठी खरेदी करतात. भाऊ सुद्धा बहिणीसाठी काहीतरी उपहार विकत आणतात.

     रक्षाबंधन हा बहीण भावाचे प्रेम टिकवून ठेवण्याचा सण आहे. हिंदू धर्मात असे अनेक सण परंपरा फार पूर्वी पासून सुरु आहेत. ह्या परंपरा आपल्या संस्कृतीचा भाग आहेत आणि रक्षाबंधन देखील त्यातील आज एक सुंदर परंपरा आहे. म्हणूनच माझा आवडता सण रक्षाबंधन आहे.

--लेखक-मोहित पाटील
---------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.01.2023-सोमवार.