तुझ्यावाचून राहीन कसा, प्रिये माझे जीवन आहेस तू

Started by Atul Kaviraje, January 09, 2023, 10:46:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक  प्रेम-विरह-गीत ऐकवितो. "मै दुनिया भुला दूंगा, 'तेरी चाहत में"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही निशा-सोमवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (मै दुनिया भुला दूंगा, 'तेरी चाहत में)
------------------------------------------------

                    तुझ्यावाचून राहीन कसा, प्रिये माझे जीवन आहेस तू
                   ---------------------------------------------

तुझ्यावाचून राहीन कसा, प्रिये माझे जीवन आहेस तू
जीवनाला नाही अर्थ, जगण्याला नाही अर्थ, माझे सर्वस्वच आहेस तू,
तुझ्यावाचून राहीन कसा, प्रिये माझे जीवन आहेस तू

एकही दिवस नाही गेला, रात्रही नाही सरली, तुझ्याच विचारात आहे मी
उन्हेही नाही सरत, मनही नाही भिजत, ऋतूही सारे कोरडे भासती
ऋतुराणी माझी तूच आहेस, सारे निरस तुझ्यावाचून,
तुझ्यावाचून राहीन कसा, प्रिये माझे जीवन आहेस तू

जीव होतो कासावीस, तळमळ वाढतेय मनाची, उदासवाणा होतोय मी
झुरतो पाहण्यासाठी, स्मरतो दिनराती, तुझी झलक दिसण्यासाठी
रात्रही जागून काढू लागलोय, सखये तुझ्यावाचून,
तुझ्यावाचून राहीन कसा, प्रिये माझे जीवन आहेस तू

जिव्हाळ्याची एकच तू, माझी मैत्रीण आहेस तू, रोज मला दिसावीस तू
अपेक्षा आहे मनीची, सफलता जीवनाची, कधी जीवनी येशील तू
जीवन अर्थपूर्ण होईल माझे, सखे तुला मिळवून,
आता वाट कशाची पाहायची, आता नको उशीर प्रिये, मनाची राणी आहेस तू,
तुझ्यावाचून राहीन कसा, प्रिये माझे जीवन आहेस तू

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.01.2023-सोमवार.

(विशेष सूचना- कुणालाही या गाण्याचा योग्य तो वापर करायचा असेल, किंवा गायचे असेल, तर माझी काही हरकत नाही. तुम्ही हे गाणे गाऊ शकता, मला याचे काहीही अधिकार नकोत.)
=========================================