IIश्री गणेशाय नमःII-अंगारकी संकष्टी चतुर्थी-पार्वतीच्या बाळा,पायात वाळा

Started by Atul Kaviraje, January 10, 2023, 11:32:25 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 IIश्री गणेशाय नमःII
                               "अंगारकी संकष्टी चतुर्थी"
                              ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज  दिनांक-10.01.2023-मंगळवार, अंगारकी संकष्टी चतुर्थीचा पावन दिन आहे . श्री गणेश चरणी वंदन करून, ऐकुया श्रीगणेश गीत - "पार्वतीच्या बाळा,पायात वाळा"

     Sankashti Chaturthi 2023 Date : नवीन वर्षात यंदा १० जानेवारीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. यावेळी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येत असल्याने तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे संबोधण्यात येईल. गणपती बाप्पासोबतच या दिवशी हनुमानाच्या पूजेचेही विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीचे महत्त्व, विधी, शहरांप्रमाणे चंद्रोदयाची वेळ आणि शुभ मुहूर्त.

     संकष्टी चतुर्थीचा उपवास पश्चिम आणि दक्षिण भारतात विशेषत महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये पाळला जातो. संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. हे व्रत कोणिही करू शकते. हे व्रत दोन प्रकारांनी करतात. मिठाची संकष्ट चतुर्थी व पंचामृती चतुर्थी. या व्रतात दिवसभर उपवास करावा. उपवासानंतर चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. त्यानंतरच भोजन करावे.

                संकष्‍टी चतुर्थी शुभ मुहूर्त :--

     पंचांगानुसार संकष्‍टी चतुर्थी व्रत १० जानेवारी २०२३ ला केले जाईल. संकष्‍टी चतुर्थी प्रारंभ १० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजून ९ मिनिटांनी होईल. तर समाप्ती ११ जानेवारी रोजी २ वाजून ३१ मिनिटांनी होईल.

              संकष्‍टी चतुर्थी पूजा विधी आणि महत्व--

     प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणालाही करता येते. सकाळी स्नानादी कार्ये उरकल्यानंतर एका चौरंगावर गणपतीची स्थापना करावी. गणपतीची षोडशोपचार पूजा करावी. गोडाचा नैवेद्य दाखावावा. दिवसभर उपास केल्यानंतर चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. त्यानंतरच भोजन करावे. चंद्रदर्शन हा या व्रतातील महत्त्वाचा भाग आहे.

                   अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत कथा--

     हिंदू पुराणात गणेशाच्या संबंधित अध्यायानुसार, गणपतीचा अंगारकी नामक एक भक्त होता. ऋषी भारद्वाज आणि माता पृथ्वीचा पुत्र अंगारकीने एके दिवशी गणेशाची आराधना सुरु केली. या तपस्येने प्रसन्न होऊन श्रीगणेश त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि सोबतच एक वर मागण्यास सांगितले. यावेळी अंगारकीने त्यांच्याकडे अशी मागणी केली की, मला तुमच्या नावाशी जोडले जायचे आहे. या मागणीनंतर श्रीगणेशाने अंगारकीला वरदान दिले, ज्यानुसार पुढील काळात जेव्हा जेव्हा चतुर्थी आणि मंगळवार हा योग्य जुळून येईल तेव्हा त्यास अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधले जाईल.

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                   ---------------------------------------------

                               "पार्वतीच्या बाळा,पायात वाळा"
                              ----------------------------

आला रे आला गणपती आला
आला रे आला गणपती आला

आला रे आला गणपती आला
आला रे आला गणपती आला

पार्वतीच्या बाळा,पायात वाळा
पार्वतीच्या बाळा,तुझ्या पायात वाळा
पुष्प हारांच्या घातलात माळा
ताशांचा आवाज
ताशांचा आवाज तारारारा   झाला र
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा   झाला र
गणपती माझा नाचत आला

मोदक लाडू संगतीला घेऊ
भक्ती भावाने देवाला वाहु
गणरायच गुण गान गाऊ
डोळे भरून देवाला पाहु
देवाला पाहु,देवाला पाहु
देवाला पाहु,देवाला पाहु
गाव हा सारा रंगून गेला
गणपती माझा नाचत आला
ताशाचा आवाज तारारारा   झाला र
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा   झाला र
गणपती माझा नाचत आला

वंदन माझे,तुझिया पाया
धरी शिरावर,कृपेची छाया
भक्ताला या दर्शन दयाया
देवा आधी  देवा हे गणराया
देवा आधी देवा हे गणराया
देवा आधी देवा हे गणराया
लहान थोरा आनंद झाला
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा   झाला र
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा   झाला र
गणपती माझा नाचत आला

फटाके उड़ती जय जय होय

--आनंद शिंदे
------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.01.2023-मंगळवार.