II श्री गणेशाय नमः II-सिद्धिविनायका पाहतोस ना रे !

Started by Atul Kaviraje, January 10, 2023, 11:39:12 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II श्री गणेशाय नमः II
                                   ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मंगळवार-दिनांक-१०.०१.२०२३. नवं-वर्षातील आज  पहिली "अंगारकी संकष्टी चतुर्थी". मंगळवारी येत असल्यामुळे या चतुर्थीचे अनन्य-साधारण महत्त्व असते. चला तर "गणपती बाप्पा मोरया"चा जय-घोष करूया. मित्रानो, गणपतीचे, अखिल महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारे एक देव-गणेश-स्थान म्हणजे मुंबई नगरीतील दादर-प्रभादेवीचे " श्री सिद्धिविनायक मंदिर ". मंगळवारी, संकष्टी चतुर्थीस, अंगारकीस, श्री गणेश जयंतीस येथे गणेश-दर्शनास भाविकांची झुंबड उडालेली असते. सामान्यांचे ठीक, पण मोठ्या व्यक्तींचे, सेलिब्रेटींचे काय ? ते थोडंच रांगेत उभे राहताहेत. तर त्यांच्यासाठी विशेष असे पास सिद्धिविनायक संस्थेने-ट्रस्टने ठेवलेले आहेत. कालच म्हणजे दिनांक-०९.०१.२०२३-सोमवार रोजी, यु-ट्यूब ला एक बातमी होती, की या VIP किंवा VVIP व्यक्तींना जे दर्शन पास दिले जातात त्यामध्येही गोंधळ, घोटाळा, अफरातफर सुरु आहे. मला यातून काहीही बोध होत नाही. ऐकुया याच विषयावर एक वास्तव-वादी कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "सिद्धिविनायका पाहतोस ना रे !"

                              "सिद्धिविनायका पाहतोस ना रे !"
                             -----------------------------

आज तुझा पावन दिवस
"अंगारकी संकष्टी चतुर्थी" खास
गणेशा, माझा तुला नमस्कार,
"बाप्पा मोरया" आमचा आहेस.

तुझे पुण्य-पावन स्थान प्रसिद्ध
तू येथील विनायक-सिद्ध
दर्शनाची तव भाविकांना आस,
त्यांना घडविते दूरचाही प्रवास.

भाविक येति तुझे मंदिरी
तुज चढविती माला दुर्वांकुरी
मोदकांचा प्रसाद तुज अर्पिती,
मनोभावे तुझी पूजा करिती.

दर्शना तव झुंबड उडते
पाहता पाहता गर्दी वाढते
भाविक रांगेत उभे राहती,
तव दर्शनाची वाट पाहती.

तव दर्शना प्रतिष्ठितही येति
VIP,VVIP अन सेलिब्रेटीही असती
ट्रस्ट दर्शना खास-पास ठेविते,
दर्शन त्यांचे सुलभ होते.

पण हे काय ऐकतोय मी ?
कालच अIली कानावर बातमी
पास वाटपामध्ये घोटाळा होतोय,
वरचा पैसा कुणाकडे जातोय ?

याचे पाठी कोण सूत्रधार
पवित्र स्थानीही असा गैर-व्यवहार ?
श्री गणेशाचे पावन स्थान हे,
तिथेही होतेय ही अफरा-तफर ?

नांव घेऊन फायदा नाही
यात गुंतलेत कोण नाही ?
भ्रष्टाचार देवळातही होत राही,
सिद्धिविनायका, तू उघड्या डोळ्यांनी पाही ?

सिद्धिविनायका पाहतोस ना रे !
तुला कसे पाहवते सारे ?
अमंगळाचा नाश का नाहीस करत ?
घोटाळ्यास उघड का नाहीस करत ?

बा, गणेशा दाखव तुझा चमत्कार
बंद होउदे लुचपतीचा व्यवहार
तुझ्या मंदिरी घडूनही हे,
तू गप्प का आहे ?

सर्वांना आण वठणीवर तू
वाईटाचा नाश कर तू
सारे मंगल कर तू,
विघ्न-विनाशक मोरया आहेस तू.

आता फक्त नको पाहूस
फक्त मूर्तीतच नको राहूस
साऱ्यांना आशीर्वाद दे तू,
"गणपती बाप्पा" आमचा तू.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.01.2023-मंगळवार.
=========================================