निघाली बुलेट ट्रेन मुंबईला

Started by Atul Kaviraje, January 10, 2023, 05:56:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,
   
     मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन निर्माण मार्गावर आहे. थोड्याच वर्षात ती रुळावरून अति-वेगाने धावूही लागेल. भारताचे यंदाचे पंत-प्रधान श्री मोदी यांचे आणि एक स्वप्न पूर्ण होईल. मित्रांनो, याच विषयावर ऐकुया एक विनोदी-भावी-वास्तव कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "निघाली बुलेट ट्रेन मुंबईला"     
     
                                 "निघाली बुलेट ट्रेन मुंबईला"
                                 ------------------------

मोदींचा एक नवीन फंडा
गुजरातवरून दाखविलाय हिरवा झेंडा
बुलेट ट्रेन निघालीय मुंबईला,
पारावर नाहीय गुज्जू-भाईंच्या आनंदाला.

     प्रयोजन काय बुलेट ट्रेनचे
     निमित्त काय महागड्या खर्चाचे
     डोक्यातून ऊठ-सुठ शकला निघतात,
     नाहक तोट्यात देशाला घालतात.

कोण येईल या ट्रेनमधून
सामान्य माणसाला का परवडणार ?
आधीच लोकल परवडत नाही,
सारा पगार का टाकणार ?
     
     बिझनेसमॅनची यात शाही सवारी
     इथे येतील फक्त गुज्जू-व्यापारी
     धनिकांची ही आलिशान ट्रेन,
     शीत डब्यातून मिळतेय चैन.

चार-दोनशे धनिकबाळे यातून येतील
सारा व्यापार गुजरातला नेतील
मुंबई उद्योगधंद्यांचे आहे माहेर-घर,
सारा धंदाच हे बुडवतील.

     आधुनिक तंत्रज्ञानाची ही ट्रेन
     गोळीच्या वेगाची हिची देन
     सुसाट धावते, थांबतच नाही,
     पाहता पाहता दिसेनाशी होई.

पुढे जाणे केव्हाही चांगले
भविष्य-वेध घेणे केव्हाही चांगले
प्रगती करावी मनुष्याने निरंतर,
ट्रेन कापतेय जलद अंतर.

     जनोपयोगी कार्य व्हावे सरकारकडून
     म्हणून तर दिलंय निवडून
     हा फंडा नंतर पाहू,
     सर्व-सामान्यांचा प्रश्न आधी सोडवू.

निघाली बुलेट ट्रेन मुंबईला
मोदींचा हा फंडा आवडला
जपानचे आधुनिक तंत्र अंगिकारले,
भारत जगाच्या बरोबरीने धावले.

     स्वागतच आहे बुलेट ट्रेनचे
     मुद्दा थोडा स्थगित ठेवूया
     इतर गरजांकडे लक्ष पुरवूया,
     सर्व-सामान्यांचे आधी हीत साधूया.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.01.2023-मंगळवार.
=========================================