मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-89-रक्षाबंधन

Started by Atul Kaviraje, January 10, 2023, 09:30:20 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-89
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "रक्षाबंधन"

     रक्षाबंधनाचा सण प्रत्येक वर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण भाऊ-बहिणीचे प्रेम आणि कर्तव्याच्या प्रतीक असतो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात. भाऊ देखील बहिणीला सदैव संरक्षणाचे वचन देतो. रक्षाबंधनाचा हा सण आपल्या देशात प्राचीन काळापासून साजरा केला जात आहे.

     रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी सकाळी लवकर अंघोळ करून पूजेचे ताट सजवतात, पूजेच्या ताटात कुंकू, राखी, अक्षदा, दिवा, मिठाई इत्यादी वस्तू ठेवल्या जातात. त्यानंतर घराच्या पूर्व दिशेला भावाला बसवून त्याची आरती ओवाळली जाते, डोक्याला कुंकू व अक्षदा लाऊन बहीण भावाला राखी बांधते. आणि शेवटी गोड मिठाई खाऊ घातली जाते. भाऊ सुद्धा बहिणीला मिठाई खाऊ घालतो व बहिणीसाठी आणलेले उपहार तिला भेट देतो.

     पूर्वीच्या वेळी रक्षाबंधन अतिशय सात्विक पूजा पद्धतीने साजरी केली जायची. परंतु आता वेळेच्या अभावाने पूजा पद्धतीत बदल केलेले आहेत. आता लोक पूर्वीपेक्षा या सणात कमी सक्रिय होतात. दूर राहणाऱ्या बऱ्याच बहिणी रक्षाबंधनच्या दिवशी भावाला कुरियरने राखी पाठवून देतात. याशिवाय मोबाईल वर राखी पाठवून सुद्धा रक्षाबंधनच्या शुभेच्छा देखील दिल्या जातात.

     स्वतःला मॉर्डन दाखवण्यासाठी आपण आपली संस्कृती विसरत आहोत. आपण आपल्या पूजा पद्धती मध्ये बदल केलेला आहे. जर आपल्याला भारतीय संस्कृतीचे रक्षण करावयाचे तर जुन्या पद्धती अनुसार सण-उत्सव साजरे करायला हवे. रक्षाबंधनच्या पवित्र सणाचे महत्व लक्षात घेऊन त्याला योग्य रीतीने साजरे करायला हवे.

--लेखक-मोहित पाटील
---------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.01.2023-मंगळवार.