पांडुरंग भजन-गीत-विठ्ठला विठ्ठला हाक मारली

Started by Atul Kaviraje, January 11, 2023, 11:41:32 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II विठ्ठल विठ्ठल II
                                   -----------------


मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार. पांडुरंगाचे नाम मुखी घेऊन त्याच्या भजनात दंग होऊया. ऐकुया पांडुरंगाचे एक भजन-गीत. या गीताचे शीर्षक आहे-

                                 विठ्ठला विठ्ठला हाक मारली
                               -------------------------

सुबक मंदिर चंद्रभागेच्या तीरी
वसलीय तेथे पांडुरंगाची नगरी
विठ्ठला विठ्ठला हाक मारली,
विठ्ठल मूर्ती मनात भरली.

सावळे ध्यान, हात कटेवरी
उभे निश्चल, नेसूनि पितांबरी
मकर कुंडले कानी झळकली,
विठ्ठल मूर्ती मनात भरली.

अठ्ठावीस युगे उभा विटेवरी
भक्त पुंडलिक भक्ताचा कैवारी
माता पित्याची सेवा केली,
विठ्ठल मूर्ती मनात भरली.

आषाढी कार्तिकी निघतेय वारी
दिंडी भक्तांची पांडुरंग नगरी
विठ्ठल नामाने पंढरी गर्जली,
विठ्ठल मूर्ती मनात भरली.

तूच हर आणि तूच हरी
संकटी तूच मजसी तारी
तव दर्शनाने पुण्याई लाभली,
विठ्ठला विठ्ठला हाक मारली.

देवत्त्वाचा अंश तुझ्यात वास करी
दुष्टांचे तू निर्दालन करी
भक्तांना मायेची पाखर घातली,
विठ्ठला विठ्ठला हाक मारली.

संतांच्या घरी केलीस चाकरी
त्यांचीही खाल्लीस तू भाकरी
वरदानIची त्यांचेवर खैरात केली,
विठ्ठला विठ्ठला हाक मारली.

विठ्ठला आलो आज तुझे द्वारी
करुनि पुन्हा नियमित वारी
सेवेसी तुझ्या कायI वाहिली,
विठ्ठला विठ्ठला हाक मारली.

आस हीच एक अंतरी
नमन माझे नित स्वीकारी
तुझी मूर्ती मनात कोरली,
विठ्ठला विठ्ठला हाक मारली.

विठ्ठल मूर्ती मनात भरली
पांडुरंगाने इच्छा पूर्ण केली
विठ्ठला विठ्ठला हाक मारली,
विठ्ठलाने माझी हाक ऐकली.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.01.2023-बुधवार.
=========================================