प्रदर्शन अंगाचे, राजकारण वादाचे

Started by Atul Kaviraje, January 11, 2023, 03:59:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,
     
     आज-काल उर्फी जावेद मॅडम महा-चर्चेत आहेत. एक मॉडेल आणि फॅशन गर्ल अशी ही उर्फी आपल्या उघड्या अंग-प्रदर्शनासाठी सु (कु) प्रसिद्ध आहे. सद्या बातम्यात तीच चर्चेत आहे. आणि तिच्यापाठोपाठ काही राजकारणी स्त्रियांनीही या युद्धात उडी घेतली आहे. उर्फी मॅडम आणि या राजकIरणी स्त्रियांचे सद्या तुंबळ युद्ध सुरु आहे. त्यांच्यातील वाद हा वाढतच चालला आहे. तो मिटेल तेव्हा मिटेल, पण या विषयावर ऐकुया  एक वास्तव राजकारणी व्यंगात्मक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "प्रदर्शन अंगाचे, राजकारण वादाचे"

                             "प्रदर्शन अंगाचे, राजकारण वादाचे"
                            --------------------------------

मुंबई कुठे वाहत चाललीय ?
उघड्या अंगाची स्पर्धा चाललीय ?
पटतंय का पहा मित्रांनो,
आंबट-शौकिनांची कशी चंगळ उडालीय ?

     पीक आलंय मॉडेल-गर्ल्सचं आतासे
     ठीकच आहे इतपत असे
     पण चक्क उघडे अंग-प्रदर्शन,
     होत नाहीय मनास पटेनासे.

उर्फी जावेद यातलीच एक
तिच्या छबी आहेत अनेक
बातम्या फक्त तिच्याच झळकताहेत,
सारे नुसते यू-ट्यूबच पाहताहेत.

     प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे इथे
     पण प्रत्येकाने ठरवायचे असते
     नितीस धरून वागायचे असते,
     अनीतीस इथे स्थान नसते.

उर्फीने स्वतः समजून घ्यावे
स्त्री-दाक्षिण्याचा गैर-फायदा घेऊ नये
उघड्यावर अंग-प्रदर्शन नकोच ग,
मॉडेल उत्तमच आहेस तू ग.

     बाकी उर्फी तुझी मर्जी
     पण इतरांची आहे खप्पा-मर्जी
     राजकारणाला एक कारण मिळालेय,
     अनोखे राजकारण रंगत चाललेय.

प्रदर्शन अंगाचे, राजकारण वादाचे
या वादाने जोर पकडलाय
अंग-प्रदर्शन करावे की नये करू,
मुद्दा लागलाय जोर धरू.

     आपापसात सुरु झालीत भांडणे
     उर्फीला काय यात देणे-घेणे ?
     ती आपसूकच बाजूला झालीय,
     एकमेकांतच जुगलबंदी सुरु झालीय.

इतर बाजूला राहिलेत मुद्दे
या विषयावरच मारताहेत गुद्दे
एक म्हणतोय, अंग-प्रदर्शन चालेल,
दुसरा म्हणतोय, अंग-झाकलेले परवडेल.

     कार्य जोरात सुरु आहे उर्फीचे
     तिला नाहीय देणे-घेणे कशाचे
     रोज एक नवीन छबी येतेय,
     फॅशनच्या दुनियेत हलकल्लोळ माजवतेय.

कुठे तरी याला बंधन हवे
कुठे तरी याला मर्यादा हवी
भविष्यात निर्माण होतील अनेक उर्फ्या,
CLOTH-INDUSTRY लागेल बंद ठेवावी.

     हिंदू संस्कृती जपण्यात यावी
     उघड्या अंग-प्रदर्शनावर बंदी यावी
     आपले नाहीत हे संस्कार,
     स्त्री ही पूर्ण कपड्यातच शोभावी.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.01.2023-बुधवार.
=========================================