मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-90-होळी

Started by Atul Kaviraje, January 11, 2023, 09:40:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-90
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "होळी"

     मित्रांनो आपल्या देशात दरवर्षी अनेक सण उत्सव साजरे केले जातात. त्यापैकीच होळी हा आपल्या देशातील काही प्रमुख सणांपैकी एक आहे. होळीचा सण संपूर्ण भारतात मोठी उत्साहाने साजरा केला जातो.

     भारतात होळी किंवा रंगपंचमीच्या सणाला रंगांचा सण म्हटले जाते. होळी हा भारतातील महत्त्वाचा सण आहे. होळीचा हा सण प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. होळीच्या दिवशी मित्र व नातेवाईकांना रंग लावून आनंद साजरा केला जातो. या दिवशी सर्व लोक आपले दुःख विसरून एकमेकांसोबत आनंद साजरा करतात. मला इतर सर्व सणांमध्ये होळी हा सन जास्त आवडतो. माझा आवडता सण होळी आहे.

     होळीचा सण साजरा करण्यामागे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये एक कथा सांगितली आहे. या कथेनुसार प्राचीन काळात एकदा हिरण्यकश्यप नावाच्या एका देत्य राजाने अमरत्वाचे वरदान प्राप्त करून पृथ्वीवरील प्रजेला त्रास देणे सुरू केले. त्याची एक दृष्ट बहिण 'होलिका' होती. होलिकाला आगीत न जाळण्याचे वरदान प्राप्त होते. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता. प्रल्हाद च्या विष्णु भक्तीला कंटाळून हिरण्यकश्यपूने त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. या कार्यासाठी त्याने आपली बहिण होलिका ची मदत मागितली. होलिका प्रल्हाद ला धरून आगीत जाऊन बसली, परंतु भगवान विष्णुच्या कृपेमुळे होलिका त्या अग्निमध्ये जळाली व भक्त प्रल्हाद सुखरूप बाहेर पडला. अशा पद्धतीने होलिका दहन म्हणजेच होळी ही वाईटावर चांगल्याचा विजय दिवस आहे.

     होळी चा सण दोन दिवसांचा असतो यात पहिल्या दिवशी होळी जाळली जाते तर दुसरा दिवस हा धुलीवंदनाचा असतो या दिवशी रंगपंचमी खेळून एक दुसऱ्याला रंग लावले जातात. होळी दहनासाठी सार्वजनिक ठिकाणी एका मोठ्या दांड्याला लाऊन त्याची पूजा केली जाते. यानंतर होळीच्या मुहूर्तावर दांड्याला काढून त्याच्या चारही बाजूंना लाकडे लावली जातात. याची पूजा केल्यानंतर लाकडांना आग लावली जाते. शेतकरी आपल्या शेतातील धान्याचे काही दाणे या आगीत टाकतात. व आग शांत झाल्यावर उरलेल्या राखेमधून काही राग आपल्या घरी पूजेसाठी नेतात.

     होळीचा दुसरा दिवस धुलीवंदनाचा असतो. या दिवशी कुटुंबातील सदस्य तसेच मित्रमंडळी एकमेकांना रंग लावून आनंद साजरा करतात. एक दुसऱ्यावर पाणी टाकून एकमेकांना भिजवले जाते. अशा पद्धतीने मस्ती व खेळाने सर्व थकवा निघून छानसे मनोरंजन होते.

     होळी व रंगपंचमी हा माझा आवडता सण असण्यामागे कारण हे आहे की हा सन एक-मेकांना मध्ये एकता निर्माण करतो, प्रेम, आनंद व उत्साह वाढवतो. हा सण लहान मोठे, भाऊ बहीण, शेजारी-पाजारी सर्वांना सोबत राहून एक दुसऱ्याचे सहकार्य करण्याची शिकवण देतो. आज-काल होळी खेळताना बरेच लोक केमिकलयुक्त रंगांचा वापर करतात, हे रंग आपले शरीराची त्वचा व डोळ्यांना घातक ठरू शकतात. म्हणून होळी खेळताना कोरड्या गुलाल चा वापर करायला हवा. गुलाल चे कोणतेही नकारात्मक प्रभाव शरीरावर होत नाही. कोणाशीही जोर जबरदस्ती व भांडण न करता प्रेमाने होळी खेळायला हवी.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                   -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.01.2023-बुधवार.