भावी उपाय, प्लास्टिकला बायो-प्लास्टिकचा पर्याय

Started by Atul Kaviraje, January 12, 2023, 12:06:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     कालच म्हणजे दिनांक-११.०१.२०२३-बुधवार रोजी, यु-ट्यूब ला एक बातमी ऐकली, प्लास्टिकला पर्याय म्हणून बायो-प्लास्टिकचा शोध नव्याने पुन्हा नांदेड शास्त्रज्ञानी लावला आहे. प्रत्येक शोधामध्ये काही नावीन्य हे येतंच असतं. पाहूया हा प्लास्टिकचा नवीन जन्म मनुष्याला कितपत फायदा देतो ते, या पुढील कवितेतून. माझ्या कवितेचे शीर्षक आहे-  "भावी उपाय, प्लास्टिकला बायो-प्लास्टिकचा पर्याय"
     
                      "भावी उपाय, प्लास्टिकला बायो-प्लास्टिकचा पर्याय"
                     ---------------------------------------------

शोध हे लागतंच असतात
जुने, इतिहासजमा होत नसतात
त्यात नवीनता येत असते,
नवं-कल्पनांना जन्म देत असते. 

     नांदेड शास्त्रज्ञांचा नवीन शोध
     प्लास्टिकला बायो-प्लास्टिकचा नवा पर्याय
     मनुष्याचे जीवन सुखरूप अधिक,
     होण्या हा अनोखा उपाय.

जुने प्लास्टिक अति घट्ट
घनत्व त्याचे अति दाट
वापरण्या अति अवजड होई,
नंतर नंतर अति बोजड होई.

     विघटन त्याचे होत नाही
     जुन्यातले जुने टिकून राही
     जळू म्हणता जळत नाही,
     स्वास्थ्यास मानवाच्या हानिकारक होई.

प्रदूषणाचा त्याचा वाढता थर
नदी नाल्यांची वाढतेच स्तर
असेच जर राहिले सुरु,
जगाचा ऱ्हास होईल सुरु.

     नांदेड शास्त्रज्ञ धावले मदतीस
     जागतिक धोका त्यांनी ओळखलाय
     प्लास्टिकला पर्याय म्हणून बायो-प्लास्टिक,
     शोध त्यांनी आतासा लावलाय.

बायो-प्लास्टिकचा पातळ थर
कोणत्याही कामात याचा वापर
देई सुरक्षा अन सुबकता,
आणि देई अति मुबलकता.

     वजनास हलके, अति टिकाऊ
     त्यामुळे होतंय ते जास्त बिकाऊ
     हाताळण्यास सुरक्षित, वापरण्यास सुस्थितीत,
     अति घाऊक आहे ते किमतीत.

विघटनही याचे सुलभ होई
हलके असल्यामुळे वितळून जाई
प्रदूषण यामुळे होणार नाही,
मानवाचे जीवन सुरक्षित राही.

     बायो-प्लास्टिक सर्वांस ठरलंय वरदान
     शास्त्रज्ञांनी पदरात टाकलाय दान
     सर्व क्षेत्रांत होतोय वापर,
     सर्व ठिकाणीच वाढलाय व्यापार.

असेच शोध लागत राहावेत
मनुष्याचे जीवन सुरक्षित राहावे
प्लास्टिकला बायो-प्लास्टिकचा पर्याय,
आहे भविष्यातला नामी उपाय.

     याने प्रदूषण होईल शून्य
     हा शोध होईल जगन-मान्य
     बायो-प्लास्टिक जीवन बदलेल,
     भविष्यात एक वरदानच ठरेल. 
     
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.01.2023-गुरुवार.
=========================================