१२-जानेवारी-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, January 12, 2023, 09:43:36 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१२.०१.२०२३-गुरुवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "१२-जानेवारी-दिनविशेष"
                                 -----------------------

-: दिनविशेष :-
१२ जानेवारी
राष्ट्रीय युवक दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००६
हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३६२ यात्रेकरुंचा मृत्यू
२००५
राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना
१९९७
सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला 'बाया कर्वे पुरस्कार' प्रदान
१९३६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा
१९३१
सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी
१९१५
महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.
१७०५
सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९१८
सी. रामचंद्र – संगीतकार
(मृत्यू: ५ जानेवारी १९८२)
१९१७
महर्षी महेश योगी
(मृत्यू: ५ फेब्रुवारी २००८)
१९०६
पं. महादेवशास्त्री जोशी – साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक
(मृत्यू: १२ डिसेंबर १९९२)
१९०२
महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक
(मृत्यू: १३ जुलै १९६९)
१८९९
पॉल हर्मन म्युलर – डी. डी. टी. या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९४८) मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ
(मृत्यू: १२ आक्टोबर १९६५ - बेसल, स्वित्झर्लंड)
१८९३
हर्मन गोअरिंग – जर्मन नाझी
(मृत्यू: १५ आक्टोबर १९४६)
१८६३
स्वामी विवेकानंद – भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी 'रामकृष्ण मिशन'ची स्थापना केली.
(मृत्यू: ४ जुलै १९०२)
१८५४
'विज्ञान यात्री' व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद. नेपच्युन ग्रहापलीकडे परिक्रमा करीत असलेला ग्रह आणि त्याची परिक्रमा याचे भाकीत केतकर यांनी केले होते.
(मृत्यू: ३ ऑगस्ट १९३०)
१५९८
राजमाता जिजाबाई
(मृत्यू: १७ जून १६७४)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००५
अमरीश पुरी – आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार
(जन्म: २२ जून १९३२ - लाहोर, पंजाब, पाकिस्तान)
१९९७
ओ. पी. रल्हन – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते. 'तलाश', 'फूल और पत्थर', 'हलचल', 'पापी, 'शालिमार' हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
(जन्म: ? ? १९२५)
१९९२
शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ 'कुमार गंधर्व'
(जन्म: ८ एप्रिल १९२४)
१९७६
अ‍ॅगाथा ख्रिस्ती – इंग्लिश रहस्यकथालेखिका, पहिल्या महायुद्धाच्या काळात त्या रेडक्रॉस इस्पितळात काम करत होत्या. त्यावेळेस त्यांनी 'मिस्टिरियस अफेअर्स अँड स्टाइल्स' ही पहिली रहस्यकथा लिहिली. ६८ कादंबर्‍या, १०० हून अधिक कथा, १७ नाटके अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांचे साहित्य १०३ भाषांत अनुवादित झाले आहे.
(जन्म: १५ सप्टेंबर १८९०)
१९६६
नरहर विष्णू तथा 'काकासाहेब' गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल
(जन्म: १० जानेवारी १८९६)
१९४४
वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी – लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त
(जन्म: २८ एप्रिल १८५४)
१८९७
सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक
(जन्म: ४ जानेवारी १८१३)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.01.2023-गुरुवार.