मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-66-सुरकोटला अश्व: भाग 2-ब--

Started by Atul Kaviraje, January 12, 2023, 10:13:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                    लेख क्रमांक-66
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "सुरकोटला अश्व: भाग 2"

                             सुरकोटला अश्व: भाग 2--ब--
                            -------------------------

             (मागील भागावरून पुढे)--
            ----------------------     

     1991 मध्ये, सुरकोटलाच्या वायव्येला 60 किमी वर असलेल्या मोठ्या रणातील खादिर बेटावर, ज्याची तुलना फक्त मोहेंजोडारो किंवा हडप्पा बरोबरच होऊ शकेल, अशा एका सिंधू-सरस्वती संस्कृतीतील महानगराचा शोध, भारतीय पुरातत्त्व विभागाचे शास्त्रज्ञ श्री. बिश्त व त्यांचे सहकारी यांना धोलावीरा या खेड्याजवळ लागला आणि सुरकोटला व तेथील अश्व हा विवाद बाजूलाच पडल्यासारखा झाला. धोलावीरा या ठिकाणी एवढ्या प्रचंड प्रमाणात रोजच्या वापरातील वस्तू, कला-कुसरीच्या वस्तू, सील्स-सीलींग्ज, दागिने व इमारतींचे भग्नावशेष सापडले की पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांना सुरकोटलाचे विस्मरण झाले असल्याचे नवल वाटत नाही. मोहेंजोडारो व हडप्पा ही ठिकाण पाकिस्तानात गेल्याने भारताकडे या संस्कृतीतील मोठे असे उत्खनन स्थळ या पर्यंत नव्हते. ती कसर धोलावीराने भरून काढली. दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात धोलावीरामध्ये सापडलेल्या शेकडो वस्तू ठेवलेल्या आहेत. मात्र हे सगळे असले तरी घोड्याचे कोणतेही अस्थी अवशेष किंवा प्रतिकृती धोलावीरा येथे सापडलेल्या नाहीत.

     1991-92 मध्येच म्हणजे श्री. ए.बी.शर्मा यांनी सुरकोटला अश्वाच्या अस्थी अवशेषांचा शोध लावल्याला 20 वर्षे झाल्यानंतर, अश्व तज्ञ म्हणून ज्यांची जगभर ख्याती होती असे एक हंगेरियन पुरातत्त्व शास्त्रज्ञ सॅन्डॉर बोकोन्यी (Sándor Bökönyi) यांचे दिल्लीला एका परिसंवादात भाग घेण्यासाठी भारतात आगमन झाले. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मुख्य संचालकांनी त्यांना सुरकोटला येथे मिळालेल्या अश्व अस्थी तपासण्याची विनंती केली. त्यांनी त्या अतिशय बारकाईने तपासल्या आणि नंतर परिसंवादात केलेल्या आपल्या भाषणात, अत्यंत स्पष्ट शब्दात या तपासणीचा अहवाल देताना सांगितले:--
" सुरकोटला अश्वाचा खालचा जबडा आणि दात यावर असलेल्या एनॅमलचा आकार(pattern), पुढच्या दातांचा साईज आणि फॉर्म व खुराजवळील हाडे यांचा पुरावा लक्षात घेता हा प्राणी एक खराखुरा अश्व (Equus caballus L) आहे हे सिद्ध होते. प्लायस्टोसीन युगानंतरच्या कालात, भारतीय उपखंडात रानटी घोडे अस्तित्वात नसल्याने, हा अश्व पाळलेला होता या बद्दल कोणतीही शंका घेण्याची आवश्यकता नाही."
"The occurrence of true horse (Equus caballus L ) was evidenced by the enamel pattern of the upper and lower cheek and teeth and by the size of and form of incisors and phalanges. Since no wild horses lived in India in post-pleistocene times, the domestic nature of the Surkotada horse is undoubtful."

(क्रमशः)--
--------

--चंद्रशेखर
(March 20, 2013)
--------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.01.2023-गुरुवार.