घुंगरू माझे वाजले, पैंजण माझे गुणगुणले

Started by Atul Kaviraje, January 13, 2023, 05:12:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक प्रेम-गीत ऐकवितो. "मैंने पायल है छनकाई, फिर क्यू आया ना हरजाई"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही सांज-शुक्रवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (मैंने पायल है छनकाई, फिर क्यू आया ना हरजाई-फाल्गुनी पाठक)
--------------------------------------------------------------------------

                          "घुंगरू माझे वाजले, पैंजण माझे गुणगुणले"
                         --------------------------------------

घुंगरू तुझे वाजले, ग गोरी
पैंजण तुझे गुणगुणले
ऐकूनही तुझा प्रिया,
बघ कसा निघुनी गेला
कसा त्याने कानाडोळा करीत,
विरस तुझा केला.

घुंगरू माझे वाजले
पैंजण माझे गुणगुणले
क्षणभर मोहित हो ना
नाच नाचुनी मी बघ दमले,
प्रिया, नर्तनाने दंग हो ना
पिया, मला एकवार तू पहा ना
आतुर मी, तुझीच वाट पाहते,
सख्या, एकवार माझ्याशी बोल ना.

ही हवाच सांगत आहे
ती सनई वाजत आहे
माझ्या स्वप्नांचा शहजादा तू
माझ्या मनीचा राजा तू
अधीर डोळे, तुलाच शोधती
उन्मिलित ओठ, हलकेच पुटपुटती
एकदातरी मज तू दिसावास,
फक्त माझ्यासाठी इथे राहा ना.

विचारात हरवलेय मी माझ्या
जागून काढल्यात कित्येक राती 
माझ्या बांगड्या तुज पुकारीती
फक्त तुझेच नाव घेती
त्यांची खनक तू ऐक ना
आता नको तरसवूस आणि
तुज हाक देतेय ही रमणी,
हाकेला तू ओ दे ना.

घुंगरू माझे वाजले
पैंजण माझे गुणगुणले
क्षणभर मोहित हो ना
आतुर मी, तुझीच वाट पाहते,
सख्या, एकवार माझ्याशी बोल ना.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.01.2023-शुक्रवार.
=========================================