II शुभ मकर संक्रात II-कविता-2-मकर संक्रांत..!

Started by Atul Kaviraje, January 15, 2023, 10:48:14 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II शुभ मकर संक्रात II
                                  ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०१.२०२३ आहे. आजचा शुभ दिवस "मकर-संक्रांति" चा पुण्य-पर्व घेऊन आला आहे. सूर्यनारायणाचे याच दिनी मकर राशीत संक्रमण होत असते. देशभरात हा सण विभिन्न नावाने साजरा केला जातो. या दिवशी तिळाच्या आणि गुळाच्या पदार्थांना विशेष महत्त्व असते. चला तर या, सर्वांनी मिळून "तिळगुळ  घ्या  गोड  गोड  बोला" म्हणूया. आपली सारी भांडणे, हेवे-दावे मिटवून एक होऊया, एक राहूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींनI मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.  ऐकुया तर मकर संक्रांतीच्या काही गोड कविता, ज्यांचा स्वाद आपल्या जिभेवर वर्षभर घोळत राहील.

                                     "मकर संक्रांत..!"
                                    ----------------

मकर संक्रांत......?

म-नात भलतेच विचार येतात
क-रायचं तरी काय...?
र-डावं की हसावं कळत नाही
सं-ग आज काल चांगला मिळत नाही

क्रां-ती घडणार कशी....?
त-ग धरणेही आता जमत नाही

कदाचित यालाच संक्रात येणे
म्हणतात की काय देव जाणे....!

पण

मकर संक्रांतिच्या शुभेच्छा देताना
तिळगुळ देऊन गोड बोला म्हणायला
खूप खूप छान वाटते....!

आपल्या सहवासाने संक्रांत
टळल्याचे समाधान भेटते

मन कसे आपल्या
संगतीने प्रसन्न होते....!

--प्रशांत शिंदे
------------
 
                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                     -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.01.2023-रविवार.
=========================================