विरह-गीत-जगणे माझे हे, जगणेच नाही आता, तू नाहीस तर, मरणच यावे आता

Started by Atul Kaviraje, January 15, 2023, 05:59:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक विरह-गीत ऐकवितो. "अब तेरे बिन जी लेंगे हम, ज़हर ज़िन्दगी का पी लेंगे हम"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही सांज-रविवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (अब तेरे बिन जी लेंगे हम, ज़हर ज़िन्दगी का पी लेंगे हम)
------------------------------------------------------------------

           "जगणे माझे हे, जगणेच नाही आता, तू नाहीस तर, मरणच यावे आता"
          -------------------------------------------------------------

जगणे माझे हे, जगणेच नाही आता,
तू नाहीस तर, मरणच यावे आता.
     जगणे माझे हे, जगणेच नाही आता,
     तू नाहीस तर, मरणच यावे आता.

तुझ्या प्रेमाचा, हाच का होता रंग ?
माझ्या प्रेमाला, त्याने जणू केले बेरंग
     चूक माझीच होती, विश्वास ठेवला तुजवरी
     उगा ठेवली अपेक्षा, अनपेक्षित होती सारी
          अवहेलना करीत माझी, मज टाळून गेलीस,
          प्रेमाची नाही जाण, ते तू लाथाडून गेलीस.

जगणे माझे हे, जगणेच नाही आता,
तू नाहीस तर, मरणच यावे आता.

प्रेम नाही जाणलेस, मी तुजवरी केलेले 
प्रेम नाही ओळखलेस, सच्च्या मनाने दिलेले
     आज तुला जाणलंय, किंमत नाहीय प्रेमाची
     आज मी ओळखलंय, जाणीव नाहीय प्रीतीची
          केलेले वादे तोडून गेलीस, माझ्या मना दुखवून,
          वफाईची तुझ्या हद्द झाली, बेवफाई ओंजळीत टाकून.

जगणे माझे हे, जगणेच नाही आता,
तू नाहीस तर, मरणच यावे आता.

मन मोडणं जमतंय तुलाच, हृदयाचे तुकडे करून गेलीस
मन माझं जाणलं नाही, तू कुठेतरी कमी पडलीस
     माझीच चूक झाली, तुला मन देऊन बसलो
     ती माझीच भूल होती, तुला वचने देऊन भुललो
          अजाण होतो मी, नादानच होतो मी,
          जाणले नाही मी तुज, प्रेमात बुडालो होतो मी.

जगणे माझे हे, जगणेच नाही आता,
तू नाहीस तर, मरणच यावे आता.

जा प्रिये निघून आयुष्यातून, खुश रहा तू
माझ्या मनाने स्वीकारला विरह, आनंदी रहा तू
     पुनः नको येऊ परतुनी, मी राहीन एकटा
     आता नको प्रेमाचे नाव, मी जगेन एकटा
          डोळेही आज कोरडे आहेत, भाव नजरेत नाहीत,
          हृद्य अनुभव घेतलाय मी, निरसच प्रेमाचे संगीत.

जगणे माझे हे, जगणेच नाही आता,
तू नाहीस तर, मरणच यावे आता.
     जगणे माझे हे, जगणेच नाही आता,
     तू नाहीस तर, मरणच यावे आता.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.01.2023-रविवार.
=========================================