मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-70-महामार्ग पोलिसाचा आगळा अनुभव

Started by Atul Kaviraje, January 16, 2023, 09:39:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-70
                                  ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "महामार्ग पोलिसाचा आगळा अनुभव"

                            महामार्ग पोलिसाचा आगळा अनुभव--
                           -------------------------------

     वास्तविक मलादेखील ही अडचण जाणविली होतीच. त्याविषयी मी वेळोवेळी माय कार या चिंचवड स्थित मारूती सुझुकीच्या अधिकृत विक्रेत्यास व विक्रीपश्चात सेवाकेंद्रास कळविले होते. परंतु त्यांनी मी सांगत असलेली बाब हा दोष नसून वाहनात दिलेले एक अधिकचे सुरक्षा वैशिष्ट्य (Safety Feature) असल्याचा निर्वाळा मला प्रत्युत्तरादाखल दिला असल्याने मी याबाबतीत काही करू शकलो नव्हतो. ही सर्व हकीगत मी श्री. सरोदे यांस कथन केली. त्यावर त्यांनी वाहनात असे कुठलेही सुरक्षा वैशिष्ट्य नसून हा माझ्या वाहनातील दोषच असल्याचे ठामपणे सांगितले. इतकेच नव्हे तर मारूती सुझूकी अथवा त्यांच्या विक्री पश्चात सेवा केंद्रांकडून हा दोष नसून सुरक्षा वैशिष्ट्य असल्याचे मी लेखी स्वरूपात प्राप्त करून घ्यावे असेही त्यांनी मला सूचविले. तसेच या बाबत मला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देत स्वत:चा खासगी भ्रमणध्वनी क्रमांक (८३९०१४७०००) देखील दिला.

     श्री. सरोदे यांच्या सल्ल्यानुसार मी धुळे येथे पोचल्यावर सेवा ऑटोमोटिव्ज या अधिकृत विक्री पश्चात सेवा केंद्रात वाहनात असलेला सदर दोष दाखविला. याही ठिकाणी अधिकार्‍यांनी हा दोष नसून सुरक्षा वैशिष्ट्य असल्याचा राग आळविला. तेव्हा मी लगेचच श्री. सरोदे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला व अधिकार्‍यांना त्यांच्या सोबत चर्चा करण्यास सांगितले. श्री. सरोदे यांनी हे सुरक्षा वैशिष्ट्य असेल तर ग्राहक पुस्तिकेत (owner's manual) त्याचा उल्लेख का नाही? अशी विचारणा केली. तसेच याविषयी काही अधिकृत माहिती छापील स्वरूपात अथवा संकेतस्थळावर (internet website) उपलब्ध असल्यास त्याचा तपशील देण्यास फर्माविले.

     त्यानंतर सेवा ऑटोमोटिव्जच्या अधिकार्‍यांनी सुरक्षा आसन पट्ट्यासंबंधातील सदर बाब ही सुरक्षा वैशिष्ट्य नसून दोष असल्याचे मान्य केले. तसेच कुठलाही अतिरिक्त मोबदला न आकारता अर्थात पूर्णपणे मोफत (Free Of Cost) आसन सुरक्षा पट्टा बदलून दिला. आता या नवीन सुरक्षा आसन पट्ट्यामुळे मला कुठलाही त्रास न होता अतिशय सोयीस्कर रीत्या विषम पातळीच्या रस्त्यावरही वाहन चालविता येते. जराही अवघडलेपण जाणवत नाही.

     हे सर्व श्री. अंबादास सरोदे, महामार्ग पोलीस चाळीसगांव यांच्या सहकार्यामूळेच शक्य झाले. श्री. सरोदे यांचा मी अत्यंत आभारी आहे.

--चेतन सुभाष गुगळे
(March 18, 2013)
--------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.01.2023-सोमवार.
=========================================