१७-जानेवारी-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, January 17, 2023, 09:07:22 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१७.०१.२०२३-मंगळवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिनविशेष"

                                   "१७-जानेवारी-दिनविशेष"
                                  -----------------------

-: दिनविशेष :-
१७ जानेवारी
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००१
अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील 'सूर्या पुरस्कार' शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.
२००१
कथ्थक नृत्यांगना डॉ. रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा 'कालिदास सन्मान' जाहीर
१९५६
बेळगाव – कारवार आणि बिदर या जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा
१९४६
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.
१९४५
दुसरे महायुद्ध – रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.
१८७४
चँग आणि एंग
डावीकडचा एंग आणि उजवीकडचा चँग
चँग आणि एंग (बंकर) या प्रसिद्ध सयामी जुळ्यांचा एका चिनी दांपत्याच्या पोटी जन्म. या दोघांचेही लग्न होऊन त्यांना एकूण २१ अपत्ये झाली (चँग १० आणि एंग ११)!
(जन्म: ११ मे १८११)
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९४२
मुहम्मद अली ऊर्फ कॅशिअस क्ले – अमेरिकन मुष्टियोद्धा. अमेरिकन वर्णभेदाचा निषेध म्हणून त्याने धर्मांतर करुन मुहम्मद अली हे नाव स्वीकारले.
(मृत्यू: ३ जून २०१६)
१९३२
मधुकर केचे – साहित्यिक
(मृत्यू: २५ मार्च १९९३)
१९१८
रुसी मोदी – टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पद्मभूषण (१९८९)
(मृत्यू: १६ मे २०१४)
१९१८
सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ 'कमाल अमरोही' – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी
(मृत्यू: ११ फेब्रुवारी १९९३)
१९१७
एम. जी. रामचंद्रन
२०१७ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट
मरुथर गोपाल तथा एम. जी. रामचंद्रन – अभिनेते, ए. आय. ए. डी. एम. के. या राजकीय पक्षाचे संस्थापक व तामिळनाडूचे तिसरे मुख्यमंत्री, भारतरत्न (१९८८)
(मृत्यू: २४ डिसेंबर १९८७)
१९०८
अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ 'एल. व्ही. प्रसाद' – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
(मृत्यू: २२ जून १९९४)
१९०६
शकुंतला परांजपे – कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात अनन्यसाधारण कार्य केलेल्या समाजसेविका
(मृत्यू: ३ मे २०००)
१९०५
दत्तात्रय रामचंद्र कापरेकर – गणितज्ञ
(मृत्यू: ? ? १९८६)
१८९५
विठ्ठल दत्तात्रय तथा वि. द. घाटे – लेखक व शिक्षणतज्ञ, रविकिरण मंडळातील एक कवी
(मृत्यू: ३ मे १९७८)
१७०६
बेंजामिन फ्रँकलिन – अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी
(मृत्यू: १७ एप्रिल १७९०)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०२०
रामचंद्र गंगाराम तथा 'बापू' नाडकर्णी – डावखुरे मंदगती गोलंदाज
(जन्म: ४ एप्रिल १९३३ - नाशिक)
२०१४
रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री. उत्तमकुमारबरोबर त्यांची जोडी बंगाली चित्रपटांत चांगलीच गाजली.
(जन्म: ६ एप्रिल १९३१ - पाबना, पाबना, बांगला देश)
२०१३
ज्योत्स्‍ना देवधर – मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या
(जन्म: २७ फेब्रुवारी १९२६)
२०१०
ज्योति बसू – प. बंगालचे ७ वे मुख्यमंत्री (कार्यकाल: २१ जून १९७७ ते २८ ऑक्टोबर २०००), भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे [CPI(M)] सहसंस्थापक व पॉलिट ब्यूरो सदस्य
(जन्म: ८ जुलै १९१४)
२००८
रॉबर्ट जेम्स तथा 'बॉबी' फिशर – अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर
(जन्म: ९ मार्च १९४३)
२०००
सुरेश हळदणकर – गायक आणि अभिनेते
१९९५
डॉ. व्ही. टी. पाटील – शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, तिसऱ्या लोकसभेतील खासदार (१९६२ - १९६७), ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक
(जन्म: ३१ जुलै १९०० - शिगाव, जि. सांगली)
१९८८
लीला मिश्रा – अभिनेत्री
(जन्म: ? ? १९०८)
१९७१
बॅ. नाथ पै
बॅ. पंढरीनाथ बापू तथा नाथ पै – स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ, प्रजा समाजवादी पक्षाचे नेते, दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या लोकसभेतील खासदार (राजापूर), त्यांची लोकसभेतील भाषणे अत्यंत प्रभावी आहेत. मराठी, संस्कृत व इंग्लिश तसेच फ्रेंच व जर्मन भाषांवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते.
(२५ सप्टेंबर १९२२)
१९६१
पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान
(जन्म: २ जुलै १९२५)
१९३०
अँजेलिना येओवार्ड ऊर्फ 'गौहर जान' – गायिका व नर्तिका
(जन्म: २६ जून १८७३)
१८९३
रुदरफोर्ड हेस
व्हाईट हाऊसमधील अधिकृत चित्र
रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष (कार्यकाल: ४ मार्च १८७७ ते ४ मार्च १८८१)
(जन्म: ४ आक्टोबर १८२२)
१७७१
गोपाळराव पटवर्धन – पेशव्यांचे सरदार
(जन्म: ? ? ????)
१५५६
हुमायून – दुसरा मुघल सम्राट
(जन्म: ७ मार्च १५०८)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.01.2023-मंगळवार.
=========================================