विनोदी-व्यंगात्मक कविता-हेल्मेट घालून चालल्या रॅलीला

Started by Atul Kaviraje, January 17, 2023, 10:51:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,
       
     सोमवारी, दिनांक-१६.०१.२०२३ रोजी यू-ट्यूबला एक बातमी ऐकली की, वाहतूक पोलिसांचे जन-जागरण अभियान सुरु आहे. या अंतर्गत त्यांनी हेल्मेटची, वाहन चालकांवर सक्ती करण्यावर जोर दिला आहे. वाशीम येथे, त्यांनी या दिवशी फक्त महिलांना या अभियाना-अंतर्गत हेल्मेट घालून स्कुटर रॅली करण्यास आमंत्रित केले होते. झाले, महिलांना मैदान मोकळे मिळाले होते. ऐकुया, या विषयावर एक विनोदी-व्यंगात्मक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "हेल्मेट घालून चालल्या रॅलीला"

                              "हेल्मेट घालून चालल्या रॅलीला"
                             ----------------------------

आज स्त्रियांना मिळालीय मुभा
जन जागरणI भरलीय सभा
नियमांचे महत्त्व पटवून देण्या,
हेल्मेट घालून चालल्या रॅलीला.

     पोलिसांनी आयोजन केलय रॅलीचे
     अधिकार दिलाय फक्त बायकांना
     नटून-थटून साऱ्या पहा आलेल्या,
     स्कुटर रॅली मिळून काढायला.

सक्ती केलीय सरकारने आताशी
हेल्मेट नाही प्रवास नाही
वारंवार होणारे अपघात टळतात,
वर डोकेही सुरक्षित राही.

     जन-जागृतीचे ध्येय ठेवून नजरेसमोर
     पोलिसांनी दिलेय आग्रहाचे निमंत्रण
     रॅलीत सहभागी व्हावे सर्वांनी,
     स्त्रियांना कधी लागते का आमंत्रण ?
     
नवीन स्कुटर घेतल्या विकत
नवऱ्याचा खिसा बिनधास्त कIपत
वर म्हणाल्या नवीन साडी,
मज घेऊन द्याना नाथ.

     साज-शृंगार नख-शिखांत केला
     ओठांवर लिपस्टिकचा ब्रश फिरवला
     पायी उंच टाचांच्या चपला,
     बाई निघाली पहा स्कुटर-रॅलीला.

वर दागिन्यांचा साज चढविला
साडीला मॅचिंग ब्लाऊजही घातला
हेल्मेट घालून स्वारीण निघाली,
जणू काही नातेवाईकांच्या लग्नाला.

     रॅलीचे फक्त निमित्त होते
     बायकांना साऱ्या नटIयचे होते
     वर स्कुटरला टाच मारुनी,
     त्यांना फक्त मिरवायचे होते. 

असंख्य बायका झाल्यात सामील
रहदारीच्या वाहतूक नियमांच्या रॅलीत
सारे नियम राहिलेत बाजूला,
चालल्यात जणू लोणावळा फिरायला.

     गर्दी जमली बायकांना पाहायला
     जोतो काम सोडून चालला
     आपल्याला पाहायला गर्दी पाहून,
     चालल्या स्कुटरला वेग देऊन.

काय निवड केलीय पोलिसांनी
त्यांचे कौतुकच करावेसे वाटते
सुरक्षा नियम, हेल्मेट राहिले बाजूला,
गप्पा-गोष्टींत जास्त लक्ष असते. 

     काही का असेना, बायकांना
     आज वेळ मिळालाय संसारातून
     वाट पाहताहेत नवीन रॅलीची,
     हौस भागवता येईल, नटण्या-मुरडण्याची. 

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.01.2023-मंगळवार.
=========================================