लाल कांदा

Started by Dnyaneshwar Musale, January 18, 2023, 12:23:29 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

आजही किर किरीचा आवाज झाला की काळपट अंधाऱ्याच्या राती आठवतात आणि तीव्र वेदना व्हाव्या आणि त्यातुन एखादी रक्ताची चिळकांडी बाहेर यावी आणि सर्रकन सार रक्त बम बाळं व्हावं असच काही,
पिर्या रातीला उठला आणि ताडकन चालत सुटला बा न आवाज केला कुठं र निघाला गड्या, बापाच्या आवाजाला उमजत पिर्या न प्रतिउत्तर केलं व्हय चाललोय इथंच, जराशी वरच्या खिळपाटला पाणी पाजून आलो, पिर्या तसा धिप्पाड , कामाला जणू हत्तीचं रात्रीचा दिवस करायचं आणि यंदा लई पिकवायच एवढं च त्याच्या डोकश्यात सारख फिरत असायचं,
गावाच्या चावडीवर  तर त्यानं कधीच काना डोळां केला होता, जणू चावडी च त्याच काही बिनसलं असच, एकदा गावात चोरी झाली व्हती आणि पोलीस आलंय म्हणून पिर्या लई घाबरल व्हतं त्योच सांगायचा म्या आधीच लई घाबर गुंडी आणि तो पोलीस मलाच ईचारी चोर कसा व्हता , म्या तो लई घाबरलू पण तो पोलीस एक मॅडम व्हती आणि त्या लई बिनधास्त व्हत्या  तव्हा मला कळलं पोलीस नुसतं पोरच  नाय व्हती  तर पोरी पण व्हत्यात, तव्हा पासून त्याच्या डोक्यात सरीला पोलीस करायचं ,
सरी तुझी लई हुशार हाय अस मास्तर पिर्याला नुसता म्हणायचं पिर्याला समजत तस काहीच नव्हतं पण हुशार हाय एवढंच उमजायचं, सरी ले पोलीस करायचं म्हंजी सरी चोर हुडकून काढणार हे मात्र नक्की हाय,
कितीही उमेद असली तरी रोजचा दिस कधी मावळायचा आणि अंगावरचा घाम सुकुन जणू  काळोखा हसायला सुरुवात करायचा, रातीचे रात किडे चमकतील काय तेवढाच तो उजेड चमकायचा तसाही पिर्या च्या कंदिलाच राकेल हे पाण्याचा एखादा आटलेल्या  तळ्या  एवढाच , तरी पिर्या हार न मानता साऱ्या रानाला पाणी काळोखात च पाणी पाजायचा आणि दिसा त्या शेतातल्या राणा क बघून हसायचा, कारण त्याचा रानातला कांदा चांगलाच फुगला व्हता, सरीन वह्या आनि डिरेस मगितलाय,  हे समद कांद इकल की त्याच सार पैसे घेणार आणि सरीला समद शाळेच घेणार आणि मगच सावकाराच पैसे देणार,एवढं च पिर्याच्या डोक्यात.
आज ही तसाच सरी ला कांद्याक चाललोय  सांगून रानात कांद भरायला पिर्या निघाला आज तर अजूनच खुश व्हता कारण आज समदा माल इकला जाणार व्हता,
एक एक गोण दामनान टाचताना त्याच्या फाटक्या आयुष्याला नव्या कापडाच तिघाळ लावलं जातंय अस वाटायचं , साऱ्या गोण्या एकल्यान  भरून त्या मार्केटला शेजारच्या राघू काकाच्या गाडी मधून त्यो मार्केटला घेऊन गेला, खरतर शाळेत जाणारी सरी आज पहिल्यांदाच गाडीत बसून गाव सोडून गावाबाहेर तालुक्याला मार्केट मधी आली होती, तिला त्याच सार कुतुहुल वाटत व्हतं, एखादं स्वप्न पडून मन त्यात च रमून जावं असच तिला झालं व्हतं, शेजारी दिसणारी दुकान, दुकानातली  खेळणी, गाडीवर विकणारे फुगे सारं तिला आनंद देऊन जात व्हतं, पिर्या ही तिला हसताना पाहून  हसत व्हता,
गाडी मार्केटच्या अंग वळली आणि गोण्या मोंड्याला लागल्या, कडक पांढऱ्या शुभ्र कपड्यातला व्यापारी आपल्या मालाला आकड्यात मोजतो हे सरी ला समजत व्हतं बापाच्या चेहर्या वर उमटलेल्या आठ्या साऱ्या काही बोलून जात व्हत्या, पिर्या ची नजर साऱ्या मार्केट मधी भिरभिरत व्हती, सरी ला समजत व्हतं इथं असा लई माल हाय त्यामुळ बापाच सारं कष्ट पाण्यात गेलं, पिर्यांन खांद्यावरच उपरण खाली उतरवलं आणि एकदा तोंडावर फिरून पाणावलेलं डोळ्यांन सरी क पाहिलं आणि मार्केटमधून आडमोहरी व्हायला लागला रघु काका भाडं मागत व्हता तेवढ पैसे झालं नाही म्हणून उद्या तुझी गाडी भरायला तुझ्या क कामाला येईल असं पिर्या म्हणत व्हता, गाडीत बसून गेलेली सरी आता बापाचं बोट धरून पुन्हा घरी जायला पाई निघाली, लेकीला शिकून मोठी करायची या ईचारत असताना पिर्या लहान होऊन डोळे भरून रडत व्हता,कांदा कडू झाला एवढंच खर, सरी जणू मोठी व्हहुन पिर्याला म्हणत व्हती मला नाय शिकायच आपण घरी जाऊ ,
घरी जाता जाता उजेडाचा  अंधार कधी झाला हे दोघांना ही समजलं नाही. फक्त लई शिकवायचं लेकीला या ईचारतच पिर्या डुलका लागून गेला.