१८-जानेवारी-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, January 18, 2023, 09:46:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०१.२०२३-बुधवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "१८-जानेवारी-दिनविशेष"
                                 -----------------------

-: दिनविशेष :-
१८ जानेवारी
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००५
एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.
१९९९
नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना 'भारतरत्‍न' हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.
१९९८
मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९७
नोर्वेच्या बोर्ग आऊसलंडने एकट्याने व कोणाच्याही मदतीशिवाय अटलांटिक महासागर पार केला.
१९७४
इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.
१९५६
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार
१९११
युजीन बी. इलायने सानफ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
१७७८
कॅप्टन जेम्स कूक हा हवाई बेटांवर पोचणारा पहिला युरोपियन बनला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९७२
विनोद कांबळी
विनोद कांबळी – भारतीय क्रिकेटपटू
१९६६
अलेक्झांडर खलिफमान
अलेक्झांडर खलिफमान – रशियन बुद्धिबळपटू
१९५२
वीरप्पन
कुसे मुनीस्वामी वीरप्पन – चंदन व हस्तिदंत तस्कर. आपल्या ४० वर्षांच्या 'कारकिर्दीत' खंडणीसाठी त्याने अनेक राजकीय नेत्यांचे अपहरण केले. ९७ पोलीस आणि वनाधिकाऱ्यांसह सुमारे १८४ व्यक्ती आणि ९०० हत्तींच्या हत्येस तो कारणीभूत आहे. मात्र मानवतेवर अगाध विश्वास असणारी वीरप्पनची मुलगी विद्या वीरप्पन ही प्रखर राष्ट्रभक्तीने प्रेरित झाली आहे आणि ती सध्या तामिळनाडू भाजपाची कार्यकर्ती आहे!
(मृत्यू: १८ आक्टोबर २००४)
१९३३
जगदीश शरण वर्मा – भारताचे २७ वे सरन्यायाधीश
(मृत्यू: २२ एप्रिल २०१३)
१८८९
शंकर काशिनाथ गर्गे तथा 'दिवाकर' – नाट्यछटाकार
(मृत्यू: १ आक्टोबर १९३१)
१८८९
डी. व्ही. जी.
देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. – कन्नड कवी व विचारवंत
(मृत्यू: ७ आक्टोबर १९७५ - बंगळुरू, कर्नाटक)
१८४२
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश
(मृत्यू: १६ जानेवारी १९०९)
१७९३
प्रतापसिंह भोसले
महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले (मराठा साम्राज्याचे आठवे छत्रपती) यांचे निधन. छत्रपती शाहू (दुसरे) यांचे ते थोरले चिरंजीव होत. पेशवाईच्या अस्तानंतर माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी पुन: त्यांना छत्रपतींच्या गादीवर बसवले. पाठशाळा आणि संस्कॄत व मराठीबरोबरच इंग्रजी भाषेच्या अध्यापनाला त्यांनी उत्तेजन दिले.
(मृत्यू: ४ आक्टोबर १८४७ - वाराणसी, उत्तर प्रदेश)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.01.2023-बुधवार.
=========================================