१८-जानेवारी-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, January 18, 2023, 09:48:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०१.२०२३-बुधवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "१८-जानेवारी-दिनविशेष"
                                  -----------------------

-: दिनविशेष :-
१८ जानेवारी
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    ---------------------------
२०१५
शकुंतला महाजन तथा 'बेबी शकुंतला' – लोभसवाणे रूप, शालीन सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत ​अमीट अशी मुद्रा उमटविणाऱ्या अभिनेत्री. प्रभात फिल्म कंपनीचा 'दहा वाजता' (१९४२) हा त्यांचा पहिला सिनेमा. पुढे 'प्रभात'च्या 'रामशास्त्री प्रभुणे' सिनेमातील त्यांची भूमिका गाजली. बालकलाकार म्हणून अभिनयात ठसा उमटविलेल्या शकुंतला यांनी पुढील काळात हिंदी आणि मराठीतील दिग्गज कलावंतांसोबत काम केले आणि अनेक भूमिका उत्कृष्टपणे वठवल्या. परदेस, कमल के फूल, शिकायत, भाग्यवान, बिंदिया, बचपन, बच्चों का खेल, मोती, पूजा, नन्हे मुन्हे, सपना अशा अनेक हिंदी सिनेमांतून त्यांची कारकीर्द बहरली. १९५० मध्ये 'परदेस' हा सिनेमा लागला. मधुबाला आणि बेबी शकुंतला यांच्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळेही हा सिनेमा गाजला. हिंदीतील प्रख्यात दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या 'बिराज बहू' सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. गायक-कलाकार किशोरकुमार यांच्यासोबत फरेब, लहेरे या सिनेमातील भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. छत्रपती शिवाजी, सीता स्वयंवर, मोठी माणसं, श्रीकृष्ण दर्शन, मी दारू सोडली, अखेर जमलं, चिमणी पाखरे, मूठभर चणे, मालती माधव, संत बहिणाबाई, तोतयाचे बंड, तारामती या मराठी सिनेमातील भूमिका प्रामुख्याने गाजल्या. सिनेकारकीर्द बहरात असताना १९५४ मध्ये त्यांचा गडहिंग्लज येथील इनामदार घराण्यातील श्रीमंत बाबासाहेब नाडगौंडे यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर त्यांनी सिनेमात काम करायचे बंद करून संसाराला वाहून घेतले. राज्य सरकाने त्यांचा १९९६ मध्ये विशेष सन्मान केला होता. कोल्हापूर भूषण, करवीरभूषण, कलाभूषण, जीवनगौरव हे पुरस्कार त्यांच्याकडे चालत आले. प्रभात फिल्म कंपनीत बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर चमकलेल्या बेबी शकुंतला यांनी सहजसुंदर अभिनयाने आपला स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला. कारकीर्द बहरात असताना त्यांनी १९५४ मध्ये सिनेसृष्टीचा निरोप घेतला. मात्र, त्यांची प्रेक्षक आणि सिनेमाशी नाळ शेवटपर्यंत कायम राहिली. या अभिनेत्रीची मोहिनी शेवटपर्यंत प्रेक्षकांवर राहिली. वयाच्या ८२ व्या वर्षी ही ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली. आणि त्यांच्या रूपाने सिनेमाचा चालता बोलता इतिहासच लुप्त झाला. बेबी शकुंतला यांनी मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवला.
(जन्म: १७ नोव्हेंबर १९३२)
२००३
हरिवंशराय बच्‍चन
२००३ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट
हरिवंशराय बच्‍चन – हिन्दी कवी
(जन्म: २७ नोव्हेंबर १९०७)
१९९६
एन. टी. रामाराव
२००० मध्ये जारी केलेले टपाल तिकीट
नंदमुरी तारक तथा एन. टी. रामाराव – तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व (अविभाजित) आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री, पद्मश्री (१९६८)
(जन्म: २८ मे १९२३)
१९८३
आत्माराम रावजी भट – कृतिशील विचारवंत, 'मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज'चे संस्थापक
(जन्म: १२ मे १९०५)
१९४७
कुंदनलान सैगल – गायक व अभिनेते
(जन्म: ११ एप्रिल १९०४)
१९३६
रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक
(जन्म: ३० डिसेंबर १८६५)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.01.2023-बुधवार.
=========================================