गोर्या गोर्या गालावरी ...

Started by Jai dait, September 03, 2010, 06:01:43 PM

Previous topic - Next topic

Jai dait

Guru Thakur yaani lihilele ek apratim lagingeet....
'Tujhya Majhya Sansarala Aani kaay hava" ya chitrapatatun...
aani ya sundar geetala sangitbaddha kele aahe Ajay-Atul ya jodina...
enjoy...


गो-या   गो-या गालावरी चढली लाजेची लाली
गं  पोरी नवरी आली
सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी
गं पोरी नवरी आली

सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडव दारी
किण किण कांकण, रुणझुण पैंजण
सजली नटली नवरी आली
गो-या   गो-या गालावरी चढली लाजेची लाली
गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी
गं पोरी नवरी आली ... || धृ ||

हे नव-या मुलाची आली हळद ही ओली
हो हळद ही ओली लावा नवरीच्या गाली
हे हळदीनं  नवरीचं  अंग माखवा
हो पिवळी करून तिला सासरी पाठवा 
सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडव दारी
सासरच्या ओढीनं  ही हसते हळूच गाली
गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी
गं पोरी नवरी आली ... || १ ||

हे आला नवरदेव वेसिला, वेसिला गं
देव नारायण आला गं
मंडपात गणगोत सारं  बैसल  गं
म्होर ढोल ताशा वाजी रं ...

हे सासरी मिळू दे तुला
माहेरची माया,
माहेरच्या मायेसंग
सुखाची गं छाया
हे किण किण कांकण, रुणझुण पैंजण
सजली नटली नवरी आली
आनंदाच्या सारी तुझ्या बरसू दे घरी दारी
गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी
गं पोरी नवरी आली ... || 2 ||

हे आला नवरदेव वेसिला, वेसिला गं
देव नारायण आला गं
मंडपात गणगोत सारं  बैसल  गं
म्होर ढोल ताशा वाजी रं ...
 
-गुरु ठाकूर