साई-बाबा भजन गीत-साईंची विभूती मी कपाळी लावली

Started by Atul Kaviraje, January 19, 2023, 11:45:39 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज, गुरुवार, दिनांक-१९.०१.२०२३, माझ्या साई-बाबांचा वार. श्रद्धा-सबुरीचा मंत्र जपत, चला साईंचे पावन दर्शन घेउया, साईंची आरती गाऊया, आणि ऐकुया श्री साईंचे एक भजन-गीत. या भजन-गीताचे शीर्षक आहे- "साईंची विभूती मी कपाळी लावली" 
     
                           "साईंची विभूती मी कपाळी लावली"
                          -------------------------------

धन्य ती शिरडी, धन्य माझे साई
साक्षात प्रभू-अवतार, धन्य झाली शिरडीमाई
लीन होत भक्तगण, लागती साईंचे पायी
     बाबांच्या उदीने शिरडी सुगंधात न्हाली,
     साईंची विभूती मी कपाळी लावली.

एके दिनी अवलिया शिरडीत प्रकटला
निःसंग, फकीर म्हणून लिंबाखाली राहिला
साधू-संत तेजाचा त्याच्या प्रकाश दरवळला
     लोकांस हळूहळू याची प्रचिती आली,
     साईंची विभूती मी कपाळी लावली.

राम एक, रहीम एक, ईश्वर एक
याची सातत्याने त्याने ग्वाही दिली
जातीयवादाची त्याने दरी दूर केली
     हिंदू मुस्लिमांची त्याने एकी केली,
     साईंची विभूती मी कपाळी लावली.

चमत्कारांची तर त्याने मालिकाच दाखविली
पणतीतल्या पाण्याने सुंदर ज्योत पेटविली
लोकांची दुखणी सारी स्वतःकडे घेतली
     भक्तांचा पाठीराखा, भक्तांचा तो वाली,
     साईंची विभूती मी कपाळी लावली.

चिमटा आपटून त्याने अग्नी चेतविला
अजूनही धुमसतोय, चमत्कार मिळतो पाहायला
रक्षेने धुनीच्या सारी दुःखे निमाली
     साईनी भक्ताची दुःखे दूर केली,
     साईंची विभूती मी कपाळी लावली.

अंगात कफनी, त्याच्या फडके डोक्यास
साधी राहणी साईंची दिसली साऱ्यांस
मूर्ती शिरडीत, दर्शन मिळतेय विनासायास
     साई दर्शनास शिरडीत गर्दी जमली,
     साईंची विभूती मी कपाळी लावली.

साईंत मी माझा राम पहिला
साईंत मी माझा कृष्ण पहिला
साईंत मी माझा दत्त-गुरु पहिला
     सारी ईश्वर-रूपे साईंत सामावली,
     साईंची विभूती मी कपाळी लावली.

शिरडीत आजही साई चमत्कार घडतो
साई अस्तित्त्वाचा साक्षात्कार भक्तांना येतो
साईंची राख, रक्षा, भसम मनोभावे सेवितों
     बाबांच्या उदीने शिरडी सुगंधात न्हाली,
     साईंची विभूती मी कपाळी लावली.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.01.2023-गुरुवार.
=========================================