बेवफाई-विरह-कविता-तुझ्यावरच विश्वास होता प्रिये, त्याचाच तू केलास विश्वासघात

Started by Atul Kaviraje, January 19, 2023, 04:00:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, बेवफा सजणीची बेवफाई-विरह-कविता-गीत ऐकवितो. "मेरे नसीब में ऐ दोस्त, तेरा प्यार नहीं"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही गुरुवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (मेरे नसीब में ऐ दोस्त, तेरा प्यार नहीं)
--------------------------------------------------

                 "तुझ्यावरच विश्वास होता प्रिये, त्याचाच तू केलास विश्वासघात"
                ----------------------------------------------------

तुझ्यावरच विश्वास होता प्रिये,
त्याचाच तू केलास विश्वासघात.

तुझ्या श्रीमंतीवर होता तुज गर्व
तीच तुला प्रिय, तोच होता स्वर्ग
आम्हा गरीबांचे काय, कोण विचारी आम्हा
माझ्या गरीबीनेच केला माझा घात,
     तुझ्यावरच विश्वास होता प्रिये,
     त्याचाच तू केलास विश्वासघात.

केव्हातरी प्रेमाच्या तू आणाभाका घेतल्यास
सहज कशी तू विसरली साऱ्यास
प्रेमात तू तुझा शब्द फिरवलास
माझ्या गरिबीचा तू मजाक उडवलास,
     तुझ्यावरच विश्वास होता प्रिये,
     हे दुःख मी पितोय आतल्या आत.

तुम्हा श्रीमंतांचे असेच असते
प्रेम करायचे, मन रिझवयाचे
त्या प्रेमात आसक्तीचं नसते
मन भरले की सोडून द्यायचे,
     प्रेम खेळच वाटतोय तुला,
     हीच आहे ग माझ्या मनीची खंत.

अजुनी आहे मला आस तुझी
शपथ आहे मला आपल्या प्रेमाची
केव्हातरी येशील, होशील माझी
पण ते फक्त स्वप्नच होत,
     अपूर्णत्त्वाचं ते दुःस्वप्नचं होत,
     भंगून गेलंय ते प्रिये क्षणार्धात.

दुःखानी आज कहर केलाय
प्रेमाचा माझ्या बाजाराचं मांडलाय
तुला काहीच वाटलं नाही प्रिये
हृदयाचा भाव तुला नाही दिसलाय,
     तू माझं प्रेम नाही निभावलंस,
     जळतंय माझं हृदय तुझ्या विरहात.

ऐकून होतो, हीर रांझाची कहाणी
ऐकून होतो, लैला मजनूची कहाणी
त्यांच्या विरहात झरत होते नयन
ऐकून त्यांच्या नशिबाची करुण कहाणी,
     माझ्या नशिबात येईल वाटलं नव्हतं,
     असं कधी घडेल जाणलं नव्हतं.

तेच अश्रू माझ्या वाट्यास आलेत
तेच दुःख माझ्या नशिबी आलेय
प्रेमात गरिबी काय अन श्रीमंती काय
फरक त्यात तूच करू शकतेस,
     आता प्रेमावर विश्वास नाहीय माझा,
     हृदय विभागलंय माझं दोन तुकड्यांत.

जा प्रिये जा, पहा तुझा नवा सवेरा   
कुणाबरोबर तुझा बनव घर बसेरा
माझं काय, विरहात राहीन जळत
माझं काय, अश्रू राहीन ढाळत,
     प्रेम माझे होते खरे प्रिये,
     विरहात अजुनी मन करतंय आकांत.

मी हा असाच राहीन, प्रिये
विरहाच्या अग्नीत जळत, तेवत
तुझी श्रीमंती तुलाच लखलाभ
सुखाची गादी आहे तुझी वाट पाहत,
     माझ्या गरिबीतच आहे मी सुखी,
     हेच माझं नशीब माझ्या आयुष्यात.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.01.2023-गुरुवार.
=========================================