प्रेम-कविता-गीत-कोऱ्या मनावर माझ्या सखे, तुझंच नाव कोरलंय ग !

Started by Atul Kaviraje, January 20, 2023, 06:03:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेम-कविता-गीत ऐकवितो. "कोरा कागज़ था ये मन मेरा, लिख लिया नाम इस पे तेरा"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही सांज-शुक्रवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (कोरा कागज़ था ये मन मेरा, लिख लिया नाम इस पे तेरा)
-------------------------------------------------------------------

                   "कोऱ्या मनावर माझ्या सखे, तुझंच नाव कोरलंय ग !"
                  ----------------------------------------------

कोऱ्या मनावर माझ्या सखे,
तुझंच नाव कोरलंय ग !
माझ्या मनाची राणी तू,
तुला मनाने वरलंय ग !

पानगळीच्या माझ्या या जीवनी
तू बहार होऊन आलीस ग !
येऊन बहरलस माझं जीवन,
माझी ऋतुराणी झालीस ग !

अंगण माझे होते निष्पर्ण
सळसळता उत्साह घेऊन आलीस ग !
हिरवाईचा तरु तजेला घेऊन,
जीवन-गाणे गात राहिलीस ग !

तुला पाहिलं होत मी स्वप्नांत
तुला पाहतो मी प्रत्यक्षात
ते स्वप्न यावे प्रत्यक्षात म्हणून,
धीर देऊन गेलीस ग !

मनाचा आरसा होता कोरा
ओढही नव्हती, आसक्तीही जरा
या कोऱ्या दर्पणात माझ्या,
प्रतिबिंब ठेवून गेलीस ग !

डोळ्याला डोळा नव्हता लागत
निज कोसो दूर होती
अश्यावेळी नित्य प्रातःकाळी येऊन,
मला स्वप्न देऊन गेलीस ग !

माझेच मन वैरी होते
माझेच मन खात होते
धीर देऊन माझ्या मनाला,
मैत्रीचा आभास करून गेलीस ग !

माझी बाग होती उजाडलेली
फुले नव्हतीच कधी फुललेली
परीस-स्पर्श तुझा मिळता, प्रिये,
ती सुगंधात न्हाऊन गेली ग !

निखळलेला तारा मन माझे
निस्तेज, निष्प्रभ मन माझे
या चंद्राला हसरे करण्या,
चांदणे माझं झालीस ग !

माझे जीवन बहरुन येण्यास
तूच कारण झालीस ग !
कोरी होती मनाची पाटी,
येऊन प्रेमाचे अक्षर कोरलंस ग !

कोऱ्या मनावर माझ्या सखे,
तुझंच नाव कोरलंय ग !
माझ्या मनाची राणी तू,
तुला मनाने वरलंय ग !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.01.2023-शुक्रवार. 
=========================================