मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-74-गप्पा गणितज्ञाशी ! - भाग 5/5

Started by Atul Kaviraje, January 20, 2023, 10:03:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-74
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "गप्पा गणितज्ञाशी! भाग 5/5)"

                              गप्पा गणितज्ञाशी ! - भाग 5/5--
                             --------------------------- 

     या प्रसंगातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील बदलते भाव कॅमेऱ्यानी छानपैकी टिपलेले होते.

     अजून एका प्रसंगात एक मस्तवाल तरुण सहा पदरी हायवेवर जास्तीत जास्त वेगाने गाडी चालवत असतो. पोलीसांची गाडी त्याचा पाठलाग करत एका वळणावर गाडी थांबविण्यास भाग पाडते. इन्स्पेक्टर त्याला काही प्रश्न विचारू लागतो.
इन्स्पेक्टर : एवढ्या वेगाने तू गाडी का चालवत होतास? ठिकठिकाणी लावलेल्या वेगमर्यादेच्या पाट्या तुला दिसल्या नाहीत का?
तरुण : मुळात गाडी चालवणे म्हणजे माझ्या जीवनशैलीची अभिव्यक्ती आहे. घटनेने मला स्वातंत्र्याचे हक्क दिले आहेत. त्यामुळे गाडीच्या वेगावर मर्यादा घालणे घटनाविरोधी कृती आहे. मी गाडी जोराने चालवणारच.
इ : लेन बदलताना, ओव्हरटेक करताना तू काही सिग्नल्स वा हाताने खुणा का करत नाहीस?
त : खुणा - बिणा, रहदारीचे नियम बायकांसाठी, म्हताऱ्यांसाठी असतात. माझ्यासाठी नाही.
इ: गाडी जोरात चालविल्यामुळे इतर घाबरतात. त्यांना ब्रेक लावावे लागते. अपघात होतात. त्यांची तुला पर्वा नाही का?
त: ज्याना अशा प्रसंगातसुद्धा नीटपणे गाडी चालवता येत नसल्यास त्यानी घरी बसावे. या रस्त्यावर खरोखरच मर्दानी छाती असलेल्यानीच गाडी चालवावे.
इ: तुझ्या शेजारी तुझा मुलगा सीटबेल्ट न लावता बसलेला असल्यास याच वेगाने तू गाडी चालवशील का?
त :बिनदिक्कत! माझ्या मुलाला अगदी लहानपणापासूनच स्पर्धेत यशस्वी कसे व्हायचे, सक्षम कसे व्हायचे, शक्तीशाली कसे व्हायचे हेच मी शिकविणार आहे. इतरांची काळजी करत बसल्यास तू यशस्वी होणार नाही हेच मी त्याला शिकविणार आहे.
इ : ठीक.... पाच या संख्येला शून्य या संख्येने भागाकार केल्यास उत्तर काय येईल?
त : (एका क्षणाचाही विलंब न लावता ) शून्य.
इ : यावरून तुला अक्कल नाही हे कळते. तुझ्यासारखे हजारो रस्त्यावर गाड्या चालवतात म्हणून ही दुरIवस्था!
असे म्हणत इन्स्पेक्टर तरुणाला ढकलत ढकलतच पोलीसाच्या गाडीत कोंबतो.

     काही तरुण व तरुणीसुद्धा अशा प्रकारे वागतात हे मात्र खरे. याविषयी सरकारही हतबल आहे.

     हीच आमची तरुण पिढी असल्यास या पृथ्वीवरील MICQ 40 - 50 पेक्षा कधीच जास्त होणार नाही. जाऊ दे... तुम्ही माझ्यासाठी काही किस्से आणले आहेत का?

     कॉफीचा शेवटचा घोट घेत घेत मी त्याना हा किस्सा सुनावला.

     एक्सप्रेस हायवेवर नुकतेच ठिकठिकाणी स्पीडगन्स, सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. त्यामुळे वेगमर्यादा ओलांडणाऱ्यावर दंड बसविणे शक्य झाले होते. एका प्रसंगी वेगमर्यादा ओलांडल्याचे लक्षात आल्यावर ट्रॅफिक पोलीस पन्नाशीच्या वयातील स्मार्ट दिसणाऱ्या एका महिलेला गाडी बाजूला थांबविण्याची खूण करतो. बाई भलतीच सुसंस्कृत होती. हळू हळू गाडीची काच खाली सरकवत-
"काय हवालदार, ओळखला नाहीत का? काही प्रॉब्लेम आहे का?"
"मॅडम, आपण 80 पेक्षा जास्त स्पीडने गाडी चालवत आहात. तुमचे ड्रायव्हिंग लायसेन्स बघू दे."
"माझ्याकडे ते नाही. मी तुम्हाला दाखवू शकत नाही. "
"का नाही?"
"दोन वर्षापूर्वी माझे लायसेन्स जप्त करण्यात आले. कारण मी दारूच्या नशेत गाडी चालवत.... "
"....तुमच्या गाडीची कागदपत्र दाखवा."
"सॉरी. ही गाडी माझी नाही. खरे म्हणजे या गाडीच्या ड्रायव्हरचा खून करून त्याचे तुकडे मी गाडीच्या डिकीत कोंबलेले आहेत. दाखवू का?"
पोलीस खरोखरच घाबरला. त्याची बोबडी वळली. बाईला गाडीतच बसण्याची खूण करत तो आपल्या वरिष्ठाला फोन लावला. त्याचे बारकाईने बाईकडे लक्ष होते. बाई शांतपणे च्युयिंगगम चघळत बसली होती.
15 -20 मिनिटात 5 -6 पोलीसांच्या ताफ्यासह त्याचा वरिष्ठ अधिकारी तेथे आला. पोलीसानी पुन्हा एकदा त्याला ब्रीफिंग केले. थोडेसे घाबरतच हा अधिकारी बाईच्या गाडीपाशी गेला.
" मॅडम, माझा सहकारी तुम्ही दारूच्या नशेत गाडी चालविल्यामुळे तुमचे ड्रायव्हिंग लायसेन्स जप्त करण्यात आले आहे.असे सांगतोय. खरे की खोटे?"
"खोटे. हे बघा माझे लायसेन्स." पर्समधील लायसेन्स काढून इन्स्पेक्टरच्या हातात देते. अधिकारी आश्चर्यचकित नजरेने लायसेन्स पुढे मागे पुढे करून बघतो व लायसेन्स परत करून
"माझा हवालदार तुमच्या गाडीच्या डिकीत प्रेत आहे म्हणून सांगतोय..."
बाई डिकीची चावी त्याच्या हातात देत "तुम्हीच उघडून खात्री करून घ्या. ...."
उघडून पाहिल्यावर डिकी रिकामी असते.
"माझा तो सहकारी.... मला कळत नाही......."
बाई मात्र शांतपणे, "इन्स्पेक्टर, तुमचा हवालदार चक्क खोट बोलतो. कारण मी त्याला लाच दिली नाही. आता तो मी वेगमर्यादा ओलांडली म्हणूनही सांगेल."
इन्स्पेक्टर पूर्णपणे गोंधळलेला. तो हवालदारकडे जातो व बाई पु्हा पूर्ण वेगाने गाडी चालवत अदृष्य होते.

--प्रभाकर नानावटी
(March 14, 2013)
--------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.01.2023-शुक्रवार.
=========================================