खट्याळ-मिष्कील-कविता-गीत-मी असाच आहे प्रिये, मी खुशाल आहे प्रिये !

Started by Atul Kaviraje, January 20, 2023, 10:55:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, खट्याळ-मिष्कील-कविता-गीत ऐकवितो. "अपनी तो जैसे तैसे, थोड़ी ऐसे या वैसे"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही निशा-शुक्रवार  आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (अपनी तो जैसे तैसे, थोड़ी ऐसे या वैसे)
---------------------------------------------------

                      "मी असाच आहे प्रिये, मी खुशाल आहे प्रिये !"
                     -----------------------------------------

मी असाच आहे प्रिये,
मी खुशहाल आहे प्रिये
प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेणारा,
माणूस नेकदिल आहे प्रिये.

तू मोठ्या घरची लेक
तुझ्याकडे गाड्या आहेत अनेक
तू जुळवून घेशील का माझ्याशी,
तू राहशील का माझ्याशी नेक ?

माझ्याकडे ना गाडी, ना घोडा
माझ्याकडे ना बंगला, ना वाडा
असा माणूस मी मनमौजी,
पण प्रामाणिक आहे प्रिये.

तुझ्या दृष्टीत मी काहीच नाही
तुझ्या पाहण्यातच दोष राही
तुझ्यासारखाच मीही माणूस आहे,
मी तुझ्यासारखाच एक आहे.

जग मला लावारीस समजतंय
दुनिया मला बेवारशी म्हणतंय
पण माणसं जोडता येतात मला,
त्यांचा मी एक दुवा आहे.

शिव्याशाप दे मज कितीही
बोल लाव मज कितीही
तुझा श्रापही आहे मला दुव्यासमान,
कारण मी माणूस वेगळा आहे.

सखे, लाडात वाढलेली तू
तुला घामाची काय किंमत ?
रक्ताचे होतंय पाणी माझ्या,
मी मेहनती आहे प्रिये.

मी आयुष्यात सर्व भोगलंय
तू अजुनी असशील अनभिज्ञ   
मी हे जग पाहिलंय प्रिये,
मी माणूसच समजदार आहे.

मी असेन किंवा नसेन
कुणालाही फरक पडणार नाही
मी जगेन किंवा मरेन,
कुणी माझ्यासाठी रडणार नाही.

मी असाच आहे प्रिये,
मी खुशहाल आहे प्रिये
प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेणारा,
एक माणूस आहे प्रिये.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.01.2023-शुक्रवार. 
=========================================