प्रेमाची आठवण-कविता-गीत-तुझी आठवण सोबत होती, तुझी आठवण साथ करत होती

Started by Atul Kaviraje, January 21, 2023, 06:18:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेमाची आठवण-कविता-गीत ऐकवितो. "अकेला गया था मैं, ना आया अकेला, मेरे संग संग आया तेरी यादों का मेला"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही सांज-शनिवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (अकेला गया था मैं, ना आया अकेला, मेरे संग संग आया तेरी यादों का मेला)
--------------------------------------------------------------------------

                 "तुझी आठवण सोबत होती, तुझी आठवण साथ करत होती"
               -----------------------------------------------------

तुझी आठवण सोबत होती, प्रिये,
तुझी आठवण माझी साथ करत होती.

वाटलं मला मी असेन एकटा
प्रश्न पडला, कुणीच नाही का साथीला ?
पण तुझी आठवण सोबत होती,
तुझी आठवण साथ करत होती.

केव्हातरी तुझ्या घरापुढून गुजरलो
क्षणभर मी तेथेच थबकलो
आठवणींचा भुंगा घोंगावू लागला
प्रीत-फुलांचा सुगंध याद देऊन गेला
     ऋतू बदलला, मौसम बदलला
     पानगळ जाऊन, सखे बहर आला
     आठवण आली मज त्या दिनांची,
     सोबत होती आपल्या दोन दिलांची. 

ती बाग मला आठवली
जिथे तुझी माझी ओळख झाली
फुलांनी तुझ्याभोवती घेरा घालून
तुला आपली फुलराणी केली
     स्पर्शाने माझ्या तू अवचित मोहरलीस
     मिठीत माझ्या अलगद तू सामावलीस
     वाटतं होत काळ सरूच नये,
     आठवणीत गुंतलयं आजही मन प्रिये.

आठवण आली की मन होतंय उदास
वाटतं तुझ्या प्रेमात झालोय मी देवदास
आता एकटं राहणं नाही जमत
तुझ्याविना माझं मन नाही रमत
     वाटतं तू पुन्हा परतावीस
     वाटतं मजवर प्रेम-पाखर धरावीस
     तुझी ही आठवण कासावीस करते,
     तुझी प्रत्येक याद अस्वस्थ करते.

ते दिवस परतुनी केव्हा येतील ?
पुन्हा एकदा वचने ते निभावतील
तुझे आणि माझे मिलन
ही बाग अन ही फुले पाहतील
     या आठवणींचा आलाय कंटाळा
     प्रत्येक क्षण भासतोय वर्षासमान
     आता बस झाल्या त्या आठवणी,
     तुझ्या आठवणीतच सरत आलंय आयुर्मान !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.01.2023-शनिवार. 
=========================================