मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-100-माझे आवडते नेता महात्मा गांधी

Started by Atul Kaviraje, January 21, 2023, 10:22:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                   "मला आवडलेला निबंध"
                                      निबंध क्रमांक-100
                                  ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझे आवडते नेता महात्मा गांधी"

     माझे आवडते नेता महात्मा गांधी आहेत. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरातच्या पोरबंदर गावी झाला. भारताच्या स्वतंत्र लढ्यात गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने कार्य केले. त्यांनी इंग्रजांना भारतातून बाहेर काढण्यासाठी आंदोलने करून भारतीयांना एकत्रित केले. महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून देखील संबोधले जाते.

     गांधीजी लहान वयापासूनच अतिशय शुद्ध, शांत व सात्विक वृत्तीचे होते. ते पूर्णपणे शाकाहारी होते. गांधीजींनी आपले उच्च शिक्षण लंडन येथून पूर्ण केले. येथेच त्यांनी बॅरिस्टर ची पदवी मिळवली. गांधीचे सार्वजनिक जीवन दक्षिण आफ्रिकेत सुरू झाले. दक्षिण आफ्रिकेत जेव्हा ते पोहोचले तेव्हा त्यांना गंभीर वंशवादाचा सामना करावा लागला. भारतीयावार होत असलेल्या अत्याचाराच्या विरुद्ध त्यांनी संघर्ष केला. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना एकत्रित करून त्यांनी सत्याग्रह केला व भारतीयांना त्याचे हक्क मिळवून दिले.

     गांधीजी जेव्हा आफ्रिकेतून भारतात आले, तेव्हा ते राष्ट्रवादी नेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी चंपारण सत्याग्रह, खिलाफत आंदोलन, असहयोग आंदोलन, स्वराज्य आणि मिठाचा सत्याग्रह, हरिजन आंदोलन, भारत छोडो आंदोलन असे एक न अनेक आंदोलने केली. गांधीजीच्या भारत छोडो आंदोलनात लाखो लोक सामील झाले व इंग्रजांद्वारे हजारो स्वतंत्र सेनानी मारले देखील गेले. महात्मा गांधी सोबत लढलेल्या या सर्व स्वतंत्र सैनिकांमुळे भारत शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला.

     महात्मा गांधीचे जीवन अतिशय साधे होते. येवढे साधे जीवन असताना देखील त्याचे विचार अतीउच्च होते. त्यांनी भारतीयांना अहिंसेचा धडा शिकवला. महात्मा गांधी एक समाज सुधारक होते त्यांनी अनेक कूरितीना बंद केले. इत्यादी अनेक कारणांमुळे महात्मा गांधींना भारताचे राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                   -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.01.2023-शनिवार.
=========================================