विश्वासावरले दु:खी गीत-विश्वास माझा नाही कुणावरही, विश्वासघात होतोय माझा आजही !

Started by Atul Kaviraje, January 21, 2023, 10:57:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, विश्वासावरली एक दु:खी कविता-गीत ऐकवितो. "दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा, बर्बादी की तरफ ऐसा मोड़ा"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही निशा-शनिवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा, बर्बादी की तरफ ऐसा मोड़ा)
-------------------------------------------------------------------------

             "विश्वास माझा नाही कुणावरही, विश्वासघात होतोय माझा आजही !"
            ----------------------------------------------------------

विश्वास माझा नाही कुणावरही,
विश्वासघात होतोय माझा आजही.

नशिबाचा माझ्यावर रोष आहे
हा का माझा दोष आहे ?
विश्वास माझा तोडलाय कुणीतरी,
ज्याच्यावर विश्वास ठेवला केव्हातरी.

आज, विश्वास माझा नाही कुणावरही,
विश्वासघात होतोय माझा आजही.

विश्वास होता माझा सर्वांवरी
आज या विश्वासानेच घात केलाय
मन दिल होतं मी कुणालातरी,
माझ्या मनावर कुणी आघातच केलाय.

आज, विश्वास माझा नाही कुणावरही,
विश्वासघात होतोय माझा आजही.

मी नेकदिल माणूस होतो तेव्हा
सर्वांवर भरवसा ठेवला मी तेव्हा
पण आयुष्यातून उठवणारे होते कित्येक,
माणसाला जनावर बनवणारे होते अनेक.

आज, विश्वास माझा नाही कुणावरही,
विश्वासघात होतोय माझा आजही.

कित्येकांची मी तृष्णा भागविली
कित्येकांवर मी उपकार केले
या उपकाराची फेड त्यांनी,
मला तृषार्तच ठेवून केली.

आज, विश्वास माझा नाही कुणावरही,
विश्वासघात होतोय माझा आजही.

सर्वांचा मी सहारा होतो
वाटलं साऱ्यांचा मी आपला होतो
पण मला वाटलं तसं काहीच नव्हतं,
मी केव्हाच परका झालो होतो.

आज, विश्वास माझा नाही कुणावरही,
विश्वासघात होतोय माझा आजही.

माझ्या जीवनातील सूर्य अस्तास गेलाय
निशेचा अंधकार सर्वत्र पसरलाय
केव्हातरी मी साथ केली होती प्रकाशाची,
आज माझ्या जीवनात अंधारच झालाय.

आज, विश्वास माझा नाही कुणावरही,
विश्वासघात होतोय माझा आजही.

कुणावर का मी विश्वास ठेवावा ?
आज माझे आणि विश्वासाचे नातेच तुटलेय
या विश्वासानेच माझा विश्वास तोडलाय,
या विश्वासानेच माझा विश्वासघात केलाय.

आज, विश्वास माझा नाही कुणावरही,
विश्वासघात होतोय माझा आजही.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.01.2023-शनिवार. 
=========================================