जीवनावर एक कविता-गीत-माणसा हेच जीवन आहे, हा ऊन-सावलीचा खेळ आहे !

Started by Atul Kaviraje, January 22, 2023, 12:30:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, जीवनावर एक कविता-गीत ऐकवितो. "ये जीवन है, इस जीवन का, यही है, यही है, यही है रंग रूप"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही रविवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (ये जीवन है, इस जीवन का, यही है, यही है, यही है रंग रूप)
----------------------------------------------------------------------

                 "माणसा हेच जीवन आहे, हा ऊन-सावलीचा खेळ आहे !"
                --------------------------------------------------

माणसा हेच जीवन आहे,
हा ऊन-सावलीचा खेळ आहे.

कधी सरूप आहे, कधी अरुप आहे
जीवनाचे हेच रूप आहे
कधी रंगीत आहे, कधी बेरंगी आहे,
जीवनाचा हाच रंग आहे.

माणसा हेच जीवन आहे,
हा ऊन-सावलीचा खेळ आहे.

आनंद येतो कधी वाट्यास
दुःख करून जातंय मन उदास
सुख दुःखाचा तू वाटेकरी आहेस,
विधिलिखित तुझे अटळ आहे.

माणसा हेच जीवन आहे,
हा ऊन-सावलीचा खेळ आहे.

कधी उन्हाचे चटके बसतात
कधी सावल्या गारवा देतात
ऊन सावल्या तुझ्या आयुष्यात,
तुझ्या पाचवीला पुजल्या आहेत.

माणसा हेच जीवन आहे,
हा ऊन-सावलीचा खेळ आहे.

जास्त नको विचार करुस
वाट्याला येईल ते पत्कर
हरणे जिंकणे तुझ्या नाही हाती,
जीवन कठीण असो व सुकर.

माणसा हेच जीवन आहे,
हा ऊन-सावलीचा खेळ आहे.

जिद्द नको करुस नशिबापुढे
हेच तुझे प्राक्तन आहे
सोड नशिबावर सर्व हवाला,
हे सारे विधिलिखित आहे.

माणसा हेच जीवन आहे,
हा ऊन-सावलीचा खेळ आहे.

जे प्रेम तुला मिळालंय
त्यातच तू धन्य रहा
जो आपलेपणा तुला मिळालाय,
त्यातच तू जीवन पहा.

माणसा हेच जीवन आहे,
हा ऊन-सावलीचा खेळ आहे.

लक्ष्मी आहे चंचल माणसा
पैसा आज आहे, उद्या नाही
प्रेमच तुला बळ देईल,
तुला जगण्याचा सहारा देईल.

माणसा हेच जीवन आहे,
हा ऊन-सावलीचा खेळ आहे.

सारी  दुनिया विरुद्ध असेल
कधी आपली परके होतील
पण हे प्रेम तुला बांधून ठेवील,
तेच तुला जगण्याचा मार्ग दाखवील.

माणसा हेच जीवन आहे,
हा ऊन-सावलीचा खेळ आहे.

हताश होऊ नकोस माणसा
निराश होऊ नकोस माणसा
येईल तो दिवस आपला म्हण,
काढू नकोस कोणतेही कारण.

माणसा हेच जीवन आहे,
हा ऊन-सावलीचा खेळ आहे.

माणसा हेच जीवन आहे,
हा ऊन-सावलीचा खेळ आहे.

कधी सरूप आहे, कधी अरुप आहे
जीवनाचे हेच रूप आहे
कधी रंगीत आहे, कधी बेरंगी आहे,
जीवनाचा हाच रंग आहे.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.01.2023-रविवार. 
=========================================