मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-101-नेताजी सुभाष चंद्र बोस

Started by Atul Kaviraje, January 22, 2023, 10:33:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                   निबंध क्रमांक-101
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "नेताजी सुभाष चंद्र बोस"

     अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार.

     आज मी तुमच्याशी एक अश्या नेत्यांबद्दल बोलणार आहे ज्यांनी मला सर्वात जास्त प्रेरित केले आहे. त्या महान नेत्याचे नाव आहे सुभाष चंद्र बोस.

     सुभाष चंद्र बोस हे प्रभावशाली आणि क्रांतिकारी नेता होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात महत्वाची कामगिरी बजावली. भारतीय स्वतंत्रता युद्धात त्यांनी भारताबाहेर जाऊन आझाद हिंद फौज स्थापित केली. त्यांचे विचार क्रांतिकारी होते.

     सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 साली ओडिसा राज्यातील कटक शहरात एका बंगाली हिंदू कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस तर आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस हे कटक शहरातील प्रसिद्ध वकील होते. सुभाष चंद्र बोस हे कोलकाता विश्व विद्यालयातून पदवीधर झाले. या नंतर ते इंग्लंड ला गेले व तेथे सरकारी नोकरी ची तयारी करू लागले. सिव्हिल सर्व्हिस च्या या परीक्षेत ते चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. परंतु देशभक्ती आणि देशाला स्वातंत्र्य मिळून देण्याची इच्छा त्यांना शांत बसू देत नव्हती. एप्रिल 1921 मध्ये त्यांनी इंग्लंड मधील नागरिक सेवेतून राजीनामा दिला व ते परत भारतात आले. भारतात आल्यावर त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग घेतला. त्यांनी बंगाल आणि बंगालच्या आजूबाजूच्या परिसरातील युवकांना एकजूट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

     त्यांचे विचार गांधीवादी विचारां पेक्षा वेगळे होते. सुभाष चंद्र बोस इंग्रजांच्या अत्याचारी शासनाच्या विरोधात सशस्त्र क्रांती चे समर्थक होते. 1939 मध्ये जेव्हा द्वितीय महायुद्ध सुरू झाले. तेव्हा इंग्रजांनी त्यांना कोलकत्यात नजरबंद केले. परंतु सुभाष चंद्र बोस हे त्यांचा भाचा शिशिर कुमार बोस यांच्या मदतीने नजरकैदेतून बाहेर पडले. अफगाणिस्तान व सोव्हिएत संघाच्या मार्गाने ते जर्मनी गेले. जर्मनीत नेताजी हिटलर ला पण भेटले. या नंतर सिंगापूर ला जाऊन त्यांनी आझाद हिंद सेनेचे गठण करण्यास सुरुवात केली.

     नेताजी आपल्या आझाद हिंद फौज सोबत 4 जुलै 1944 ल बर्मा पोहोचले. इथेच त्यांनी आपला प्रसिद्ध नारा, "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा" दिला.

     18 ऑगस्ट 1945 ला टोकियो जाताना तैवान जवळ हवाई दुर्घटने दरम्यान नेताजींचा मृत्यू झाला, परंतु त्यांचे मृत शरीर मिळाले नाही. म्हणूनच नेताजींच्या मृत्यूच्या कारणांवर आज देखील विवाद सुरू आहे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                   -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.01.2023-रविवार.
=========================================