प्रेम-कविता-गीत-तू आहेस म्हणून मीही आहे, तुझ्यामुळेच जगण्याची आस आहे !

Started by Atul Kaviraje, January 23, 2023, 05:43:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेम-कविता-गीत ऐकवितो. "हमें और जीने की चाहत न होती, अगर तुम न होते"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही सांज-सोमवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (हमें और जीने की चाहत न होती, अगर तुम न होते)
--------------------------------------------------------------

             "तू आहेस म्हणून मीही आहे, तुझ्यामुळेच जगण्याची आस आहे !"
            --------------------------------------------------------

तू आहेस म्हणून मीही आहे,
तुझ्यामुळेच जगण्याची आस आहे !

तू आहेस म्हणून मीही आहे,
तुझ्यामुळेच जगण्याची आस आहे !
तू नसतास तर मीही नसते,
तू माझ्या आयुष्याचा श्वास आहेस !

प्रिया मला तुझाच सहारा होता
या वादळातून सावरलेस मजला
प्रिया मला तुझाच आसरा होता
या तुफानातून वाचवलेस मजला,
     तू माझ्या आयुष्याचा रक्षक आहेस,
     तू मला तारणारा प्रेषित आहेस !

तुला पाहता असं वाटत
ही बाग तुझ्यामुळेच फुललीय
तुला पाहता असं जाणवतंय
हा बहर तुझ्यामुळेच आलाय,
     तू माझ्या आयुष्याचा मोहर आहेस,
     तू माझ्या आयुष्याची बहार आहेस !

चाचपडत होते मी आजवर
माझ्या या काळोख्या जीवनात
येऊन तू उजेड दाखविलास
थोडासा अंश मला दिलास,
     माझ्या अंधारमय जीवनाचा तू,
     एक प्रकाशमान दिवा आहेस !

मी तुला नाही सांगू शकत
मी हे नाही बोलू शकत
की तू माझा काय आहेस ?
की तू माझा कोण आहेस ?
     पण एक नक्की आहे की,
     तू माझे सर्वस्वच आहेस !

तुझीच आशा होती मज, साजणा
तुझीच आस होती मज, प्रिया
प्राप्त तुला करण्याचा माझा
सारा ध्यास होता, सख्या,
     या तृषार्त नदीचा तू सागर आहेस,
     माझ्या आयुष्याचा तू क्षीर-सागर आहेस !

मी तुझ्याविना आनंदी राहीन
मी तुझ्याशिवाय खूष राहीन
दुःखातही मी सुख मानीन
अश्रूंना पापण्यांत झाकून ठेवीन,
     माझ्या तक्रारीचा सूर नसेल,
     माझा रुसवा, रुदन नसेल !

मला जगाची पर्वा नाही
मला लोकांचीही तमा नाही
कोणीही उगारूदे बोट माझ्यावर
कुणीही हसुदे माझ्या वर्तनावर,
     मला फक्त तूच हवा आहेस,
     जो तू आणि तूच एक आहेस !

माझं मन सांगतंय मला
माझं अंतर्मन विचारतंय मला
तू राहू शकशील त्याच्याशिवाय ?
तू कशी जगशील त्याच्याशिवाय ?
     विरहातही मी जगेन तुझ्याशिवाय,
     कारण तू माझा प्राण आहेस !

अश्रूंनी वाट मोकळी केलीय
आसवांची डोळ्यांत दाटी झालीय
दूर असलास म्हणून काय झालं ?
मनाने तूझ्या जवळीक साधलीय,
     कुठेही राहा, तू माझाच आहेस,
     कुठेही गेलास, तरी मनातच आहेस !

तू आहेस म्हणून मीही आहे,
तुझ्यामुळेच जगण्याची आस आहे !

तू आहेस म्हणून मीही आहे,
तुझ्यामुळेच जगण्याची आस आहे !
तू नसतास तर मीही नसते,
तू माझ्या आयुष्याचा श्वास आहेस !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.01.2023-सोमवार. 
=========================================