उद्या नवा प्रवास पाहू

Started by amoul, September 04, 2010, 11:53:23 AM

Previous topic - Next topic

amoul

चल सये आता तुझ्या माझ्या गावा जाऊ.
प्रीत नावाच्या नगरा एक नवे रोप लावू.

पुरे झाला उपवास हा आता,
पुरे झाला हा वनवास.
आरंभ जसा गोड होता,
तसंच गोड करू अंतास.
हि ही वाट चालताना हातात हात घेऊ.

विसरून जाऊया जे घडले बुरे,
नवे काही साठवू.
पुन्हा चालूया जुनीच वाट,
अन हळवे क्षण आठवू.
नव्याने आठवून शपथा पुन्हा सप्तपदी घेऊ.

ऋण त्यांचे फेडायचेय,
ज्यांनी दिला मदतीला हात.
दुरावले ते सारे प्रियजन,
ज्यांनी केली दुखात साथ.
विखुरले जे पक्षी सारे त्यांना पुन्हा बोलावू.

इतक्या या साऱ्यात तुला,
एक सांगायचे राहून गेले.
ठेव फक्त प्रीत ध्यानी,
विसर जे नकळत होऊन गेले.
आता पुरे हा त्रास उद्या नवा प्रवास पाहू.

....अमोल

Jai dait

"चल सये आता तुझ्या माझ्या गावा जाऊ,
प्रीत नावाच्या नगरा एक नवे रोप लावू"

मला या ओळी फार आवडल्या...फक्त एक suggestion होतं,,-  "तुझ्या माझ्या गावा" ऐवजी "प्रेमाच्या गावा" असतं तर आणखी सुबक वाटलं असतं..it's just a suggestion...please don;t mind...बाकी कविता खरंच सुंदर आहे.