पात्रात भरकटलेले जीवन गाणे-माझा किनारा दृष्टीआड झालाय, माझा गाव दूर राहिलाय !

Started by Atul Kaviraje, January 23, 2023, 10:45:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, नदीच्या पात्रात भरकटलेले जीवन गाणे ऐकवितो. "ओ माझी रे अपना किनारा, नदिया की धIरा है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही निशा-सोमवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (ओ माझी रे अपना किनारा, नदिया की धIरा है)
----------------------------------------------------------

                 "माझा किनारा दृष्टीआड झालाय, माझा गाव दूर राहिलाय !"
               ----------------------------------------------------

माझा किनारा दृष्टीआड झालाय,
माझा गाव दूर राहिलाय !

माझा किनारा दृष्टीआड झालाय,
माझा गाव दूर राहिलाय !
आता नदीच्या धाराच माझ्या सोबतीस,
त्याच लावतील मला किनाऱ्यास.

मी ती कागदाची आहे नाव
जी तरंगतेय आणि बुडतेयही
तिला कोठून असेल किनारा,
थोड्या वेळाने जाईल कोमेजूनही.

काही किनारे वाहून जातात
काही किनारे तिथेच राहतात
माझा किनाराच वाहून गेलाय,
माझा किनाराच तुटून गेलाय.

नदीची धारा वाहत आहे
तिचे पात्र खळखळत आहे
आता नदीचीच मला साथ आहे,
तिचे पात्र मला वाहून नेत आहे.

वहातI कुणी भेटेल वाटलं
पण पात्रात मी एकटाच होतो
दूरवर कुणीच नव्हतं दृष्टीपथात,
मी एकटाच वहात होतो.

कुणीच नव्हतं भेटलं प्रवाहात
वाटलं मला मदत मिळेल
किनाऱ्याची तर बातच सोडा,
न जाणो तो कधी दिसेल.

माझा गाव दूर दूर जातोय
माझा किनारा दूर दूर जातोय
आता प्रवाहातच वाहून जाणे,
हेच माझे प्राक्तन असणे.

आता किनाऱ्याची मी आस सोडलीय 
गाव नजरेतून दूरच राहिलंIय
आता हेच आहे आयुष्याचे रडणे,
फक्त प्रवाहात भरकटत राहणे.

माझा किनारा दृष्टीआड झालाय,
माझा गाव दूर राहिलाय !

माझा किनारा दृष्टीआड झालाय,
माझा गाव दूर राहिलाय !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.01.2023-सोमवार. 
=========================================