विरह कविता-गीत-तुझ्याविण मी जगू कसा सजणे, तुझ्याविण मी राहू कसा ?

Started by Atul Kaviraje, January 24, 2023, 12:04:55 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, विरह कविता-गीत ऐकवितो. "हमें तुम से प्यार कितना, ये हम नहीं जानते,मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही मध्यरात्र-मंगळवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (हमें तुम से प्यार कितना, ये हम नहीं जानते,मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना)
------------------------------------------------------------------------

                 "तुझ्याविण मी जगू कसा सजणे, तुझ्याविण मी राहू कसा ?"
                ---------------------------------------------------

तुझ्याविण मी जगू कसा सजणे,
तुझ्याविण मी राहू कसा ?

तुझ्याविण मी जगू कसा सजणे,
तुझ्याविण मी राहू कसा ?
माझे प्रेम आहे तुझ्यावर,
तुझा विरह मी सहू कसा ?

दुःख पाचवीलाच पुजलेलं असत
ऐकून होतो काही लोकांचं
जीवन कसं व्यतीत करतात
पहात होतो काही लोकांचं,
     ठाऊक नव्हतं माझ्याही बाबत हे घडेल,
     दुःखांचा डोंगर माझ्याही माथ्यावर कोसळेल !

क्षणही वाटू लागलेत दिवसासमान
दिवसही भासू लागलेत मज वर्षासमान
दिवस रात्रीचा मेळ नाही येथे
कशाचाच ताळमेळ नाही येथे,
     वाटतंय, वाट पाहता युग लोटलेय,
     तुझ्या वाटेकडे माझे डोळे लागलेत.

तू फक्त माझीच आहेस, राणी
तू फक्त माझीच आहेस, प्रिये
दुसऱ्यांची झालेली मला बघवणार नाही
मी तुला होऊ देणारंही नाही,
     तुला पाहण्यासाठी नयन झुरताहेत,
     तू दिसण्यासाठी ते आतुर आहेत.

प्रेमासाठी काय काय केलंय
हे केवळ मीच जाणतोय
प्रेमामध्ये किती मी भोगलंय
तुझ्या विरहात मी ते आठवतोय,
     आता विरह नाहीय होत सहन,
     सखे, व्याकुळच झालंय माझं मन.

वाटतंय मला विसरून गेलीस
वाटतंय मला सोडून गेलीस
पण एक आस आहे वेड्या मनाला
पुन्हा पहायचंय ग मला तुला,
     प्रेम असं वाया जाणार नाही,
     तुला मिळवल्याशिवाय मी राहणार नाही.

तुझ्याविण मी जगू कसा सजणे,
तुझ्याविण मी राहू कसा ?

तुझ्याविण मी जगू कसा सजणे,
तुझ्याविण मी राहू कसा ?
माझे प्रेम आहे तुझ्यावर,
तुझा विरह मी सहू कसा ?

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.01.2023-मंगळवार.
=========================================