आगळी-वेगळी प्रेम कविता-गीत-ती संध्याकाळ वेगळी होती, ही संध्याकाळ वेगळी आहे

Started by Atul Kaviraje, January 24, 2023, 10:35:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, आगळी-वेगळी प्रेम कविता-गीत ऐकवितो. "वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही निशा-मंगळवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है)
----------------------------------------------------------

                "ती संध्याकाळ वेगळी होती, ही संध्याकाळ वेगळी आहे"
               -------------------------------------------------

ती संध्याकाळ वेगळी होती,
ही संध्याकाळ वेगळी आहे.

ती संध्याकाळ वेगळी होती,
ही संध्याकाळ वेगळी आहे
ती संध्याकाळ दूर राहिलीय,
ही संध्याकाळ माझ्या जवळ आलीय.

जीवन तेव्हाचे वेगळे होते
आजचे जगणे वेगळे आहे
तेव्हा आणि आता मध्ये,
जणू एका दिवसाचे अंतर आहे.

त्या एका उदास सायंकाळी
तुझी झुकलेली नजर मी पाहीली
पण त्या नैराश्येतही मला,
एक वेगळी भावना जाणवली.

कदाचित माझा भ्रम असेल
माझंच नाव तू घेत असावीस
कदाचित माझा भास असावा,
मलाच तू पहात असावीस.

मध्येच काहीस वाटून गेलं
तू गालात हसत असावीस
मध्येच असा आभास झाला,
तू काहीतरी गुणगुणत असावीस.

त्या एका वेगळ्या संध्याकाळी
इतकं सारं घडलं होतं !
त्या एका वेगळ्या सायंकाळी,
हे सारं मला जाणवलं होतं ?

आजच्या सायंकाळी मला स्पष्ट आठवतंय
या संध्याकाळी मला सारं आठवतंय
जे पहात होतो तो भास नव्हता,
जे वाटत होतं तो आभास नव्हता.

माझा तो भ्रम नव्हताच
तू माझंच नाव घेत होतीस
माझा तो भास नव्हताच,
तू माझ्याकडेच पहात होतीस.

तू गालातल्या गालात हसत होतीस
तू काहीतरी गुणगुणत होतीस
तू नक्कीच गाणे गात होतीस,
गाणे गात तू मला विचारीत होतीस.

दोन्ही संध्याकाळ वेगळ्या असल्या
तरी ते प्रेम एकचं होतं
कालच्या आणि आजच्या संध्याकाळी,
प्रेम आपण जपलं होतं.

कालच्या आणि आजच्या संध्याकाळी,
प्रेम आपण जपलं होतं.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.01.2023-मंगळवार.
=========================================