द्वंद्व-प्रेम-गीत-कविता-सखे तुझ्या बोलण्यात मिठास आहे, तुझा पाहण्यात प्रेम आहे !

Started by Atul Kaviraje, January 26, 2023, 11:55:45 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, धडकते-फडकते-उडते द्वंद्व-प्रेम-गीत-कविता ऐकवितो. " भीगी भीगी रातों में मीठी मीठी बातों में"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही गुरुवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (भीगी भीगी रातों में मीठी मीठी बातों में)
----------------------------------------------------

               सखे तुझ्या बोलण्यात मिठास आहे, तुझा पाहण्यात प्रेम आहे !
              -----------------------------------------------------

सखे तुझ्या बोलण्यात मिठास आहे,
तुझा पाहण्यात प्रेम आहे !
या सर्द रातीत जवळ ये,
तुझ्या मिठीतच स्वर्ग आहे !

हा पाऊस माझा वैरी आहे
पहा कसा घनघोर बरसत आहे
छत्रीमध्ये माझ्या आडोसा घे,
जवळीक तुझी मज प्रिय आहे !

लाडात येऊ नकोस, साजणा
किती सुंदर रात्र आहे पहाना 
गार थंड सुटलाय वारा, सख्या,
तुझा ओळखलाय मी बहाणा.

खट्याळपणा तुझा चाललाय वाढतं    
व्रात्यपणा तुझा चाललाय चढतं
ढग होऊनी, सतत बरसुनी,
वाटतं, मला चाललाय तू भिजवत.

अंबरी विहरणारा मुक्त पक्षी तू
सूर मारणारा जळाचा मीन तू
या साऱ्यात तुला मी पहाते,
तुझ्या मस्करीने मी खुळी होते.

छतावर भेटण्याचे निमित्त एक
मला पाहण्याची कारणे अनेक
तुझ्या खोड्यानी मी आहे त्रस्त,
तरी तू मला आवडतोस जास्त.

मलाही तुझ्या प्रेमात भिजायचंय
मला पाऊस होऊन तुला भिजवायचंय
हा पाऊस तन मनात भिनू दे,
आपल्या प्रेमाला रंग चढू दे !

आज मनाने दिलाय इशारा
तू आहेस माझा दिलबरI
हा ऋतूही थांबलाय प्रिया,
हा काळही थमलाय प्रिया.

पुन्हा पहा गारवा आलाय
पुनः अंगावर शहारा आलाय
सर्व सर्व मोसम आजच फुललाय,
तुझ्याविना सारा सुनाच झालाय.

हा पावसाळा नेहमी येऊ दे
हा बहर नेहमीच बहरू दे
तुझ्या माझ्या प्रेमाला सख्या,
कुणाचीही नजर न लागू दे !

सखे तुझ्या बोलण्यात मिठास आहे,
तुझा पाहण्यात प्रेम आहे !
या सर्द रातीत जवळ ये,
तुझ्या मिठीतच स्वर्ग आहे !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2023-गुरुवार.
=========================================