मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-80-सुधारक आगरकर

Started by Atul Kaviraje, January 26, 2023, 09:15:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                    लेख क्रमांक-80
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "सुधारक आगरकर"

                                    सुधारक आगरकर--
                                   ----------------

     भारतीय इतिहासामधील सुप्रसिध्ध असा एक किस्सा सांगितला जातो कि टिळक व सुधारक आगरकर यांच्यामध्ये "आधी समाजसुधारणा हवी कि आधी राजकीय स्वातंत्र्य मिळायला हवे" या दोन्ही बाबीवर या दोन्ही प्रिय मित्रांचे बिनसले. पुढे आगरकर आपल्या राहिले आणि समाजसुधारणा "बुधीप्रमाण्यावाद" नियमानुसार केली. व पुढे टिळक "राष्ट्रीय सभेमध्ये" जहालांचे प्रमुख नेते बनले.

     इथे हि गोष्ट सांगण्याचा हाच उद्देश आहे कि सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी भारतवर्षाचे भवितव्य हितचिंतूनच हा आपला विचार मांडलेला दिसून येतो. यामध्ये असे दिसून येते कि ते एक ब्राह्मण असूनही एक निष्पक्ष अशी विचारधारा त्यांच्या तन आणि मनातून प्रकट होत होती. सनातनी कर्मकांड व धर्मकांड लोकांमुळे भारत वर्षातील बहुजनांचे झालेले हाल त्यांना पाहवत नव्हते. याच्याउलट टिळक मात्र आपल्या हट्टी आणि जहाल स्वभावामुळे या महत्वपूर्ण विचारापासून व सामाजिक सुधारणेच्या भावापासून अनभिज्ञ होते.

     सुधारक आगरकर यांनी बोलेल ते करून दाखवले. प्रसंगी त्यांच्याच सनातनी ब्राह्मण लोकांकडून त्यांच्या छळ झाला. त्यांनी त्यांच्या हयातीतच स्वताची अंतयात्रा पहिली. आगरकर हे मूळचे गरीब स्थितीतील असताहि त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग द्रव्य न मिळवितां समाजाचे ऋण फेडण्याकरताच केला आणि या गोष्टीला योग्य महत्त्व दिले.त्यांच्या शिक्षणामुळे त्यांना त्याकाळी खूप चांगली नोकरी भेटली असती परंतु त्यांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे कि " आई , माझे शिक्षण संपले आहे परंतु तुला वाटेल कि मी एखादी चांगल्या पगाराची नोकरी करेल व आपली परिस्थिती बदलून टाकेन पण मी असे करणार नाही . माझे संपूर्ण जीवन मी उपेक्षित, गोर-गरीब लोकांसाठी वाहून घेण्याचे ठरवले आहे". केवढा मोठा हा त्याग....

     आगरकरांनी पुण्यातच 'सुधारक' नावाचे वृत्तपत्र सुरू केले. 'सुधारक' मधून आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व इ. मुद्यांचा प्रसार केला. म्हणूनच त्यांना आपण "सुधारक" असे म्हणतो. अत्यंत अल्प आयुष्य त्यांना मिळाले परंतु यामध्ये त्यांनी सतत आपल्या समाजाप्रती सुधारणेचे बीज रोवण्याचाच प्रयत्न केला.

--शंकर माने
(March 12, 2013)
--------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2023-गुरुवार.
=========================================